मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)

श्रीवरद.

लेखांक २.

१७०२ वैशाख शु॥ २.

सेवेसी विनंति. राजश्री बाळाजी गोविंद व गंगाधर गोविंद यासी लिहितां व कारकुनाचे मुशारे देतां थकलों. परंतु पत्रोत्तर सहा सहा महिने न पाठवीत. मग बाकीचे रु।। वसुलीजमेचे गांव लाऊन देणें कळतच आहे ! कदाचित् पत्रोत्तर आलें तर आपला वोढा लिहून उमेदवारी लिहितात. याचा विस्तार पूर्वी वरचेवर सा। विनंति लिहिली व उत्तरे त्यास ताकीदपत्रासहित आलीं ते त्यांजकडे पाठविली. उत्तरें येतील ते सा। पाठऊं. तूर्त सेवकास हुजूर पातशाहीची ठिमा घेऊन यावयाची त्वरा व वर्षाकाळ समीप आलियामुळें फैसाव होईल. बहुत दिवस दर्शनलाभ न जाला, या उत्कंठेत अत्यंत चिंताग्रस्तता, दुसरे, स्वामीस शत्रूचें पारपत्य करावयाचें अहिर्णिसी उदेगाकरितां चित्त उद्विग्न. यांत सेवकानें आपली अवस्था लिहिणें परमसंकट जाणून, विनंति लिहिली की, बुंदेल्याचे मातबर तेथे असतील त्याजपासून कर्ज रुपये दहा हजार स्वामींनीं घेऊन पाठवावे. तरच जीवनोपाय होऊन दर्शनलाभ घडेल व स्वामींचा शब्द लागणार नाही व उर्जित होईल तो सुदिन करणार स्वामी समर्थ आहेत. कृपा केली पाहिजे. हुजूर येणें व तेथे रहाणें खर्चाचे तंगीमुळें दुस्तर जालें.याकरितं दर पत्रीं विंनति लि।।. याचा अपराध क्षमा केला पाहिजे. केतकीचे फुलाचा अर्क एक सिसा सा। पावलें. प्रात:कालीं पूजनोत्तर अथवा जेव्हां सरबत घेणें मर्जीस येईल त्या समई एक तोळाभर पाणियांत घालून घेतल्यास सुगंध येईल. घरीं तयार ब्राह्मणाकडून करऊंन सेवेसीं रवाना केला असे. सुरक्षित पावल्याचें उत्तरी कृतार्थ केलें पा।. दर्शनलाभ घडेल ते सुघडी. हे विनंति.