Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

व्द्यपरदशन् = बिअअरअह = बारह = बारा

त्र्यपरदशन् = तिअअरअह =तेरह = तेरा

पंचापरदशन् = पंञाअरअह = पंण्णाराह = पंण्णरा = पन्हरा = पंधरा

षडपरदशन् = सळअळअह = सोळाह = सोळा

सप्तापरदशन् = सत्ताअरअह = सत्तरह = सतरा

अष्टापरदशन् = अट्ठाअरअह = अठ्ठारह = अठारा = अठरा

येणेंप्रमाणें अकरा, बारा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा ह्या शब्दांतील र चा उगम पूर्ववैदिक भाषेंत व त्या पूर्ववैदिक भाषेच्या अपभ्रंशांत आहे.

दोन शब्दांचा समास होतांना कोठें कोठें प्रथम शब्दाच्या अन्त्यस्वराला वैदिक भाषेंत दीर्घत्व येतें. जसें, मित्रः + वरुणः = मित्रावरुणौ. येथें पाणिनि एवढेंच सांगेल कीं समास होतांना कित्येक सामासिक शब्दांत असा दीर्घत्वाचा चमत्कार होतो. हा चमत्कार कां होतो, तें पाणिनि सांगणार नाहीं व तें सांगण्याचें त्याचें काम हि नव्हतें. तो कांहीं व्याकरणाचा इतिहास लिहीत नव्हता.

मित्र + अ + वरुण = मित्रावरुणौ
या समासांतील अ चा अर्थ काय ? माझ्या मतें ह्या द्वंद्व समासांतील अ चा अर्थ आधिक्य Addition असा आहे. आ हैं अक्षर पूर्ववैदिक अपर ह्या शब्दाचा अपभ्रंश किंवा संक्षेप आहे. द्वंद्व-समास म्हणजे दोन अथवा अधिक शब्दांची मिळवणी.

मित्रेण अपरः नाम अधिकः वरुणः = मित्रावरुणौ = वरुण Together with मित्र = वरुण and मित्र.
(भा. इ. १८३५)

अकाळी [आकालिक: ] (आकाळी पहा)

अंकुश [ अंगकुश = अंकुश (अंगाला टोंचणारें शस्र) कुश् टीचणें ]

अक्कड [ आकृति = आकडी, अक्कड ] शरिराची आकडी = शरीरस्य आकृतिः.

अक्षि [ अक्षयं = अक्षि ( अव्यय, ग्राम्य ) ]
उ०- तो अक्षि मेला म्हणजे तो पूर्ण मेला, सदा मेला, कायमचा मेला. (भा. इ. १८३६).

अक्षी १ [ अक्षं ( प्रत्यक्ष ) = अक्षी ] प्रत्यक्ष.

- २ [ अक्ष्णया (उपनिषद्) = अक्षी ] a little (adverb)

अखरी [ अक्षरी ] ( अखेर पहा) .