Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
एकापरदशन् = एकाअअदशन् = एकादशन्
असें वैदिक व संस्कृत रूप निघतें. अधिक Additional या अर्थी अपर शब्द आहे. पूर्ववैदिकांतून वैदिकांत येतांना एकापरदशन् चा एकादशन् अपभ्रंश झाला असें जरी कबूल केलें तत्रापि वैदिक व संस्कृत एकादशन् पासून महाराष्ट्री एआरह शब्द कसा निघावा ? मध्यें च र कोठून आला ? तेव्हां एआरह हा एकादक या वैदिक व संस्कृत शब्दाचा अपभ्रंश नाहीं. हा एआरह महाराष्ट्री शब्द पूर्ववैदिक एकापरदशन् शब्दाचा अपभ्रंश मानला तर च र ची उपपत्ति लागते.
एकापरदशन् = एआअरदशन् = एआअरअह = एआरह म्हणजे महाराष्ट्री ही संस्कृताचा साक्षात् अपभ्रंश नसून, वैदिक व संस्कृत भाषांच्या बरोबर पूर्ववैदिक भाषेपासून निघालेल्या अपभ्रंशाचा अपभ्रंश आहे, असें म्हटल्याशिवाय गत्यंतर नाहीं. वैदिक व संस्कृत भाषा प्रचलित असतांना, पूर्ववैदिकापासून निघालेला एक किंवा अनेक अपभ्रंश किंवा प्राकृत भाषा चालू होत्या व त्या प्राकृत भाषांचा अपभ्रंश महाराष्ट्री आहे. आणि हें उघड आहे. देशांत शिष्ट भाषा व अपभ्रष्ट प्राकृत भाषा एकाच कालीं असतात, हें आपण प्रत्यक्ष पाहातों. पुण्याची शिष्ट मराठी भाषा चालू असतांना, इतर प्रांतिक मराठी भाषा व जातिपरत्वें कुणबाऊ, परभी वगैरे अपभ्रष्ट मराठी भाषा हि चालू असतात. तद्वत् च पूर्ववैदिक, वैदिक, व संस्कृत शिष्ट भाषा चालू असतां, इतर प्रांतिक व जातिक प्राकृत भाषा ऊर्फ अपभ्रंश चालू असले च पाहिजेत.
महाराष्ट्री एआरह पासून अपभ्रंशांतील एग्गारह शब्द निष्पन्न होत नाहीं. आ चा ग्गा कसा व्हावा ? तेव्हां अपभ्रशांत जो एग्गारह शब्द सांपडतो तो इतरथा व्युत्पादिला पाहिजे.
एकापरदशन् = एगाअरअह = एग्गारह
अशी परंपरा दिसते. महाराष्ट्रींत संस्कृत क चा अ होतो. परंतु अपभ्रंश ज्या प्राकृतांपासून निघाला त्यांत संस्कृत क चा ग्ग होत होता. अर्थात हेमचंद्रानें दिलेला अपभ्रंश, महाराष्ट्रीचा अपभ्रंश नव्हे; दुसर्याच कोणत्या तरी प्राकृताचा अपभ्रंश आहे.
अपभ्रंशांतील ऍग्गारह शब्दापासून मराठी अकरा शब्द निघूं शकतो.
ऍग्गारह = ऍकारा = अकरा
येथें ग चा क होत आहे. तात्पर्य मराठी अकरा हा शब्द पूर्ववैदिक एकापरदशन् शब्दापासून प्राकृतद्वारा निघालेला आहे, एकादश या संस्कृतशब्दद्वारा निघालेला नाहीं.