Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

येथपर्यंत संस्कृतांतून महाराष्ट्रीद्वारा व अपभ्रंशद्वारा एकपासून दहापर्यंत मराठींत आंखांचीं नांवें नियमाप्रमाणें निष्पन्न होतात. ह्यांच्या निष्पत्तीसंबंधानें कांहीं एक अडचण नाहीं. पण संस्कृत एकादशपासून मराठी अकरा कसा निघतो, हा प्रश्न आहे. एकादश या संस्कृत शब्दाचें नियमांप्रमाणें एआअह असें रूप व्हावें. परंतु तें तसें होत नाहीं. एआरह असें होतें. अपभ्रंशांत एग्गारह असें रूप आढळतें. आणि वर्तमान मराठींत अकरा असें रूप आढळतें. अर्थात् महाराष्ट्री एआरह संस्कृत एकादशपासून निघालेला नाही. मध्यें र कोठून आला ? अपभ्रंश एग्गारह महाराष्ट्री एआरह पासून आला नाहीं. कारण महाराष्ट्री एआरहचें अपभ्रंशांत एआग, आरा, एरा अशीं रूपें व्हावीं. तसा कांहीं एक प्रकार न होतां एग्गारह असें अपभ्रंशांत रूप आढळतें. तेव्हां, अपभ्रंश एग्गारह महाराष्ट्री एआरह व संस्कृत एकादश यांपासून निघालेलें नाहीं. मराठी अकरा अपभ्रंश एग्गारहपासून निघूं शकेल. एग्गारह = एकारा = अकारा = अकरा. पण अपभ्रंश एग्गारह तरी कोठून आला ? मध्यें र कोठून आला ? खुद्द संस्कृत एकादश शब्द कसा निष्पन्न झाला ? एक = दशन् = एकदशन् व्हावें; पण वस्तुतः एकादशन् होतें. क चा का काय म्हणून झाला ? पाणिनि एवढेंच सांगेल कीं, एक व दशन् यांचा समास होतांना क तील अ चा आ होतो. कशाचें काय होतें एवढेंच पाणिनि सांगेल. पण कां होतें हें पाणिनि सांगत नाहीं. एक + अ + दशन् = एकादशन्, अशी वास्तविक स्थिति आहे. येथें जास्त अ कां आला व कोठून आला ? माझ्या मतें एकादश हें रूप पूर्ववैदिक म्हणजे वेदाच्या हि पूर्वीच्या भाषेंतून अपभ्रंश होऊन आलेलें आहे. अधिक या अर्थी पूर्ववैदिक भाषेंत कांहीं तरी शब्द असावा. एक + ( अधिक या अर्थी पूर्ववैदिक शब्द) + दशन् = एकादश. अशा परंपरेनें पूर्ववैदिक शब्दाचा अपभ्रंश वैदिक भाषेंत एकादश झालेला आहे. वैदिक व संस्कृत भाषांचे जसे पाली, महाराष्ट्री हे अपभ्रंश आहेत, तशी वैदिक भाषा ही पूर्ववैदिक भाषेचा अपभ्रंश आहे. एकाधिकदशन् असा लांब समास उच्चारण्याला कंटाळून, एकादशन् असा संक्षिप्त उच्चार वैदिक लोक करूं लागले. तात्पर्य, एकादशन् हा वैदिक शब्द एकाधिकदशन् या किंवा याच्यासारख्या लांब पूर्ववैदिक शब्दाचें संक्षिप्त रूप आहे, यांत संशय नाहीं. हा पूर्ववैदिक शब्द बहुशः एकापरदशन् असा असावा. संस्कृताचें महाराष्ट्रींत विपरिणमन होतांना जे नियम लागू होतात, ते किंवा त्यांच्या सारखेच नियम पूर्ववैदिकाचें वैदिक भाषेंत विपरिणमन ऊर्फ अपभ्रंश होतांना लागू होत होते असें गृहीत धरून