Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १५३
श्री ( नक्कल ) १६९६ भाद्रपद वद्य १४
राजश्रियाविराजित राजमान्य रजिश्री नरसिंगराव बाबा स्वामचे सेवेसीः-
पोष्य हरी बल्लाळ सां नमस्कार विनंति उपरी येथील कुशल तागायत छ २७ रजब जाणून स्वकीय कुशल लिहीत असलें पाहिजे. विशेष. आपण घरास जाऊन फिसेन पुरंदरास आलां ह्मणोन ऐकिलें. त्यास फौजेची तयारी केलीच असेल. आपणांस येथें लवकर पाठवावें. ह्मणोन श्रीमंत उभयतांस पत्र लिहिलें आहे. तरी आपण पत्र पावतांच निघोन येथें यावें. इकडील वर्तमान श्रीमंतांस लिहितों, त्यावरून कळत असेल. श्रीमंत तापीतीरीं आहेत, उतरावयाची तजवीज होत आहे. सारें कर्म दगाबाजीचें आहे. तुह्मी येथें अशा दिवसांत असावें, यास्तव सारीं कामें एकीकडे ठेऊन जरूर यावें. फौज जमा जाहाली नसली तर मागाहून चिरंजीव घेऊन येतील. आपण लवकर यावें. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ असों दिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १५२
श्री
१६९६ भाद्रपद वद्य ९
तीर्थस्वरूप राजश्री कृष्णरावजी वडिलांचे सेवेसीः-
अपत्यें बाळाजी जनार्दन सां नमस्कार विनंती येथील क्षेम ता छ २२ रजब जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. वेदशास्त्र संपन्न राजश्री सदाशिव दीक्षित ठकार आश्रित दिा हुजरात यांचे उभयतां चिरंजीवांची तैनात सालाची सालांत देवावी, ह्मणोन पेशजी आपणास सरकारांतून पत्र असतां, सालगुदस्त सन अर्बासबैनचे तैनातेचा ऐवज अद्यापी यांस पावला नाहीं. ऐशास यांचा साल गुदस्ता ऐवज राहिला असेल तो देवावा व पुढें सालाचे सालांत यांचा ऐवज देत जावा. यांजकडील दरमहाच्या चिठ्या साल गुाच्या पानसुपारी वगैरे व कापड आंख राहिले असतील त्या देवाव्या, लोभ * करावा. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १५१
श्री
( नकल ) १६९६ माद्रपद वद्य ९
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री नारोपंत नाना स्वामीच सेवेशीं-
पो बाळाजी जनार्दन सां नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ता छ २२ माहे रजब पावेतों यथास्थित आहे. विशेष पत्र पाठविलें तें पावलें. किल्ले पुरंधर येथील बंदोबस्ताचा मजकूर लिहिला तो सविस्तर कळला. रा दिपाजीराव येरूणकर यांचें पत्र पाठविलें तें येऊन पावलें. * तुह्मीं तेथें जाऊन. बंदोबस्त केलांत, उत्तम गोष्ट झाली. गुंता उरकला. तुमचे तर्फेनें यंदा हरएक कामाबद्दल कोण प्रस्तुत आहे ? महिपतराव तों अद्याप आले नाहींत. लष्करांत गेलियावर सदैव पत्र पाठवित जावें. बहुत काय लिहिणें ! लोभ असों द्यावा. हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १५०
श्री
१६९६ भाद्रपद वद्य ८
राजश्री दिपाजीराव येरूणकर हवालदार किल्ले पुरंधर यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो बाळाजी जनार्दन आशीर्वाद विनंति उपरी येथील कुशल ता छ २१ रजब पर्यंत जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. तुह्मी जुने लोक खासगींतले कामकाज आइकत नाहींत, आणि मनास येईल तशी भाषणें बोलतात, येविशींचा मजकूर लिहिला तो सविस्तर कळला. येविशींचा मजकूर बंदोबस्त करावयाविशीं राजश्री नारोपंत नाना यांस लिहिलें होतें. त्याजवरून ते किल्ले मजकुरीं येऊन तुमचा व त्यांचा बंदोबस्त केलाच आहे. हजिरी रोजचे रोज यथास्थित होत नाहीं. यास्तव दोहों दरवाजांस दोघे कारकून ठेऊन आल्या गेल्याचा झाडा तुमचे व खानगी पेहरनगीनें होत जाईल. त्याप्रमाणें संध्याकाळी रोजचे रोज कळत जाईल. याप्रों केल्यास लोकांचा बंदोबस्त सहजच होईल. तरी, राजश्री नारोपंत नाना बंदोबस्त करून देतील, त्याप्रमाणें वर्तणुकेंत आणावें. तेथील कदीम लोकांपेक्षां हुजूर नामजादी लोकांचा भरणा फार आहे. मग चिंता काय ? बहुत काय लिहिणें? हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३८४
१५३९ फाल्गुन शुध्द ५
अज रखतखाने राजश्री सर्जाराऊ राजे दामदौलीतहू ता। हुदेदारानी व मोकदमानी हाल व इस्तकबाल मौजे वडिगौ ना। पेडिगौ कर्याती पाटस पा। पुणे बिदानद सु॥ समान अशर अलफ रामेस्वर भट बिन नारायणभट सो। आरवी मुदगल हुजूर मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर वाहाती कास देखील मळऐ रुके -।- दर सवाद मौजे मजकूर प्रज माहाद पाटील ठोबरा सालाबाद तसरुफाती चालिले आहे हाली साहेबास साल मजकुरा कारणे मुकासा अर्जानी जाला आहे हुदेदार ताज्या खुर्द खताचा उजूर करिताती सरजाम होय मालूम जाले रामेस्वरभट बिन नारायणभट सो। आरवी यास सदरहू इनाम ता। तसरुफाती आहे तेणेप्रमाणे दुमाला कीजे दर हर साल ताज्या खुर्द खताचा उजूर न कीजे तुह्मी तालीक घेउनु असली खुर्द खत भटापासी फिराउनु दीजे मोर्तब सुदु
तेरीख ३ रबिलोवल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १४९
श्री.
१६९६ भाद्रपद वद्य ६
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री नारोपंत नाना स्वामीचे शेवेसी:-
पोष्य बाळाजी जनार्दन सां नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ता छ १९ रजब पावेतों यथास्थित असे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें ते पावलें. लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. राजश्री दीपाजीराव येरूणकर यांनीं आह्मांस जुने लोकांचें बोलणें ऐकून, मजकूर लिहिला. त्याजवरून आपल्यास येविशीचा मजकूर काल लिहून पाठविलाच आहे. तरी, तुह्मीं येविशींचा मजकूर ध्यानात आणून बंदोबस्त करावा, ह्मणोन लिहिलें, त्यांनी लिहिल्यावरूनच लिहिलें आहे. दुसरा प्रकार कांहींच नाहीं. नामजाद लोकांचा भरणा किल्यावर बराच आहे. आपण जाऊन बंदोबस्त केला. उत्तम आहे. आपल्या लिहिल्यावरून खातरजमा जाली. नाहींतर दिपाजीरायांचे लिहिल्यावरून संशयांत पडलों होतों. गुंता उरकला. येविशीं दीपाजीरायास लिहितों. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दिजे. हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १४८
श्री ( नकल ) १६९६ भाद्रपद शुद्ध २
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री नरसिंगराव जनार्दन गोसावी यांसीः-
सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार. सुा खमस सबैन मया व अलफ, सरंजामी फौजेची तयारी जलदीनें करून निघोन भाद्रपद शुद्धांत हुजूर येऊन दाखल होणें, ह्मणोन पेशजीं पत्रें सादर जालींच आहेत. त्याप्रमाणें तुह्मीं सिद्धता करून निघालाच असाल. त्यास, तुह्मीं कधीं निघालां तें लिहून पाठवणें, आणि दरमजल माहादेवाचे सुमारें येऊन मुकाम करून राहणें, जाणिजे. छ १ रजब, बहुत काय लिहिणें?लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १४७
श्री. ( नकले)
१६९६ श्रावण वद्य १०
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री नरसिंगराव जनार्दन धायगुडे यांसीं:-
सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार सुा खमस सबैन मया व अलफ, तुह्मांकडील सरंजामाचे माहालांतून राजश्री मुधोजी भोंसले व हैदरे नाईक व गोविंदराव गायकवाड यांजकडे वगैरे फितुरी जागां शिलेदार वगैरे चाकरीस गेले असतील. त्यांची गांवगन्नावर चौकशी करून, घरें व वतनें ठि काणीं लाऊन, जप्त करणें. व त्यांचे माणसांकडून त्यांस कागद लिहून ते घरीं लवकर येत तें करणें. व आणखी शिलेदार तुमचे तालुक्यांत राहत असतील, त्यांणीं फितुरी सरदारांकडे चाकरीस जाऊं नये येविशी त्यांस गांवचे पाटील कुळकर्णी जामीन घेणें. ह्मणोन तुह्मीं आपले कमावीसदार यांस' माहालोमाहालीं पत्रें लिहून बंदोबस्त करणें. जाणिजे. छ २३ जमादिलाखर, बहुत काय लिहिणें ? लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १४६
श्री
१६९६ भाद्रपद यादी.
सरकारचे जाबसाल राजश्री साबाजी भोंसले सेनासाहेबसुभा याँजपासून करार करून घ्यावयाचे. सा खमस सबैन मया व अलफ..
पत्रांक १४६ लिंक
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १४५.
श्रीशंकर,
१६९६ ज्येष्ठ प्रारंभ.
यादी. ऐवज पोत्यापैकीं सरकारांतून घेतले. नांवें साबाजी भोंसले सेनासाहेबसुभा यांस खर्चाबा, सुा अर्बा सबैन मया व अल्लफ माहे जिल्हेज उर्फ फाल्गुन.
पत्रांक १४५ लिंक