पत्रांक १५०
श्री
१६९६ भाद्रपद वद्य ८
राजश्री दिपाजीराव येरूणकर हवालदार किल्ले पुरंधर यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्नो बाळाजी जनार्दन आशीर्वाद विनंति उपरी येथील कुशल ता छ २१ रजब पर्यंत जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. तुह्मी जुने लोक खासगींतले कामकाज आइकत नाहींत, आणि मनास येईल तशी भाषणें बोलतात, येविशींचा मजकूर लिहिला तो सविस्तर कळला. येविशींचा मजकूर बंदोबस्त करावयाविशीं राजश्री नारोपंत नाना यांस लिहिलें होतें. त्याजवरून ते किल्ले मजकुरीं येऊन तुमचा व त्यांचा बंदोबस्त केलाच आहे. हजिरी रोजचे रोज यथास्थित होत नाहीं. यास्तव दोहों दरवाजांस दोघे कारकून ठेऊन आल्या गेल्याचा झाडा तुमचे व खानगी पेहरनगीनें होत जाईल. त्याप्रमाणें संध्याकाळी रोजचे रोज कळत जाईल. याप्रों केल्यास लोकांचा बंदोबस्त सहजच होईल. तरी, राजश्री नारोपंत नाना बंदोबस्त करून देतील, त्याप्रमाणें वर्तणुकेंत आणावें. तेथील कदीम लोकांपेक्षां हुजूर नामजादी लोकांचा भरणा फार आहे. मग चिंता काय ? बहुत काय लिहिणें? हे विनंती.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)