Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

पत्रांक १५३

श्री ( नक्कल ) १६९६ भाद्रपद वद्य १४

राजश्रियाविराजित राजमान्य रजिश्री नरसिंगराव बाबा स्वामचे सेवेसीः-

पोष्य हरी बल्लाळ सां नमस्कार विनंति उपरी येथील कुशल तागायत छ २७ रजब जाणून स्वकीय कुशल लिहीत असलें पाहिजे. विशेष. आपण घरास जाऊन फिसेन पुरंदरास आलां ह्मणोन ऐकिलें. त्यास फौजेची तयारी केलीच असेल. आपणांस येथें लवकर पाठवावें. ह्मणोन श्रीमंत उभयतांस पत्र लिहिलें आहे. तरी आपण पत्र पावतांच निघोन येथें यावें. इकडील वर्तमान श्रीमंतांस लिहितों, त्यावरून कळत असेल. श्रीमंत तापीतीरीं आहेत, उतरावयाची तजवीज होत आहे. सारें कर्म दगाबाजीचें आहे. तुह्मी येथें अशा दिवसांत असावें, यास्तव सारीं कामें एकीकडे ठेऊन जरूर यावें. फौज जमा जाहाली नसली तर मागाहून चिरंजीव घेऊन येतील. आपण लवकर यावें. बहुत काय लिहिणें ? कृपालोभ असों दिजे. हे विनंति.