Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४२४
१६१० भाद्रपद वद्य ४
रवा सूद
शके १६१० विभवनाम सवछर भाद्रपद वद्य चतुर्थी सोमवार सु॥ तिसा समानैन अलफ तदिनि खतलिखिते धनको नाम रा। रामेस्वरभट उपाध्ये आरवीकर रिणको नाम रा। कृष्णाजी गंगाधर राजे भोसले आत्मकार्यपरवतसमध्ये तुह्मापासून कर्ज घेतले मुदल उलदुरी नखत रु॥ १०० मा। सेभरी चा। रास यासि मलातर दर माहे दर सदे रु॥ ३
तिनी प्रा। हिसेबी जे मलातर होईल ते व मुदल ऐसे देऊन यासि आन सारिखे नाही हे लिहिले सही
तेरीख १७ माहे जिलकाद मोर्तबु सुदु
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
प्रस्तुत खंडांत श्रीमंत गगनबावडेकर यांच्या दप्तरांतील इ. स. १७२८ पर्यंतचे लेख येतील. पैकीं कांहीं लेख थोरले शिवाजी महाराज ह्यांच्या कारकीर्दीतील आहेत. बावडेकर यांचे पूर्वज सोनोपंत, निळो सोनदेव व रामचंद्र नीळकंठ ह्या तिघांच्या हयातींत शहाजी, शिवाजी, संभाजी, राजाराम, दुसरा शिवाजी व कोल्हापूरचा संभाजी इतक्या पुरुषांच्या कारकीर्दी येतात; व ह्या तिघांनीं ह्या सर्व छत्रपतींच्या अमदानींत मोठमोठीं हुद्यांचीं व जोखमींचीं कामें केलेलीं आहेत. तेव्हां श्रीमंत बावडेकर ह्यांचें दप्तर मूळचें मोठें महत्त्वाचें असेल ह्यांत संशय नाहीं. परंतु इतरत्र जो प्रकार पहाण्यांत येतो त्याला अनुसरूनच ह्या दप्तरांतीलही बहुत किंवा बहुतेक जुने कागदपत्र अजीबात गहाळ होऊन गेलेले आहेत.
त्यांतून जे कांहीं थोडेसे शाबूत राहिले होते ते सध्यां प्रसिद्ध होत आहेत. प्रसिद्ध होत असलेल्या ह्या पत्रांत महदानंदाची गोष्ट इतकीच कीं, शिवाजी महाराजांची कांहीं अस्सल पत्रें प्रथमतः जगापुढें आणण्याचें श्रेय ह्या आपल्या पिढीला मिळत आहे. आजपर्यंत शिवछत्रपतींची दोन तीन पत्रेंच काय तीं छापलीं गेलीं होतीं. त्यामुळें बखरींतून व मुसलमानी तवारिखांतून दिलेलें शिवाजीचें चरित्र अजमावून व पडताळून पहाण्यास बहुतेक कांहींच साधन नव्हतें. श्रीमंत बावडेकर ह्यांच्या दप्तरांतील पत्रांवरून व इतरत्र मिळालेल्या लेखांवरून हें साधन आतां- संपूर्ण किंवा समाधानकारक तर नव्हेच - परंतु थोडेंबहुत सिद्ध होण्याच्या रंगास आलें आहे. ह्या खंडांतील हीं पत्रें व पुढील एक दोन खंडांतींल पत्रे मिळून शिवकालीन राज्यपद्धतीवर व लोकस्थितीवर बराच प्रकाश पडेल असा अजमास आहे. ह्या पत्रांचे जर फोटोझिंको काढतां आले असते तर सतराव्या शतकांतील मोडी लिहिण्याचाहि मासला वाचकांना पहावयास मिळता; व हेमाडपंतानें महाराष्ट्रांत मोडी लिहिण्याचा प्रघात मूळ पाडला तेव्हांपासून आतांपर्यंत ह्या लिहिण्यांत काय काय फेरबदल होत आले तेही कळण्यास मार्ग झाला असता. परंतु अनेक गोष्टींच्या अभावामुळें तसें सध्यां करतां येत नाहीं. हा व पुढील एक दोन खंड ह्यांची मिळून एकच प्रस्तावना लिहिण्याचा संकल्प केला असल्याकारणानें प्रस्तुत खंडांतील पत्रांना अर्थनिर्णायक, प्रसंगविवेचक व अवांतर टीपा देण्याच्या भानगडींतहि सध्यां पडत नाहीं. मुख्य प्रस्तावनेंतच एकंदर सर्वप्रकारचा उलगडा करण्याचा मनोदय आहे. कां कीं प्रस्तुत छापिलीं जाणारीं पत्रें आतांपर्यंत छापिलेल्या इतर पत्रांहून फारच निराळ्या प्रकारचीं आहेत. ज्या काळीं महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासाला प्रारंभ झाला, शिवस्वरूपी प्रौढप्रतापदिनकराच्या तेजानें हा देश देदीप्यमान झाला, आणि श्रीमत् समर्थादि थोर विभूतींच्या अरुणोदयानें ह्या देशांतील सर्व समाज खडबडून जागा झाला, त्या काळच्या पत्रव्यवहाराचा परिचय मोठ्या पूज्यभावानें व अदबीनें केला पाहिजे. मनुष्यप्राण्याच्या इतिहासांत अत्यंत जुने ग्रंथ म्हटले म्हणजे वेद हे होत. त्याप्रमाणेंच महाराष्ट्राच्या आधुनिक राजकीय इतिहासाचे अत्यंत जुने व महत्वाचे दाखले म्हटले म्हणजे प्रस्तुतचे हे लेख होत. अर्वाचीन महाराष्ट्राच्या संस्कृतीचें सर्व बीज ह्या लेखांच्या मार्मिक अध्ययनापासून कळणारें आहे. तेव्हां ह्या लेखांसंबंधीं किंवा ह्या लेखांवरतीं जें कांहीं व्याख्यान करावयाचें असेल तें, मिळण्यासारखी जेवढी म्हणून माहिती मिळवितां येईल तेवढी सर्व एकत्र संकलित केल्यानंतर, अत्यंत दक्षतेनें व जपून करणें जरूर आहे. केवळ दहा पांच तुटक लेख घेऊन त्यावर टीपा देण्यानें प्रस्तुत प्रसंगीं काम भागणार नाहीं. भाषा, व्यवहार, राजकारण, विद्या, कला, कारखाने, दरबार, पद्धती, मायने, किल्ले, लष्कर, लढाया, तह, वगैरे अनेक बाबींसंबंधीं ह्या पत्रांवरून किती अनुमानें निघतील, किती शंका उद्धवतील व कदाचित् किती वाद माजतील ह्याचा अंदाज सध्यांच करतां येत नाहीं. तेव्हां हीं पत्रे व पुढील एक दोन खंडांतील पत्रे प्रसिद्ध होऊन मर्मज्ञ टीकाकारांचें त्यांवर काय म्हणणें पडतें हें पाहिल्यानंतर त्यासंबंधीं जें कांहीं व्याख्यान करावयाचें तें करावें असा बेत आहे. निरनिराळ्या ठिकाणांहून मिळालेले निरनिराळे लेख स्वतंत्र छापावयाचे आहेत. अर्थात् दर एक ठिकाणचीं पत्रें कालानुक्रमानें निराळ्या संचानें छापिलीं जातील.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४२३
श्री १६१० आषाढ शुध्द १३
सकलतीर्थस्वरूप अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्यराजश्री बालंभट गोसावी यासि
विनंती अपत्यें कृष्णाजी राजे दंडवत उपरी एथील कुशल जाणून स्वक्षेम-वैभवलेखनाज्ञा दिधली पाहिजे विशेष आह्मी सैन्यासि स्वार जालो ते छ १० रोजी पलीपटास पावलो पुढे मजली दर मजली स्वार होऊन जातो ऐसे कळले पाहिजे सैन्यामध्ये खर्चवेचास पाहिजे समयासि न पावे याबद्दल सांप्रत रु॥ ५०० पाचसेयाचे खत लेहोन पाठविले असे खतप्रमाणे पैके अबुलनबी महालदार पाठविला आहे यापासी देऊन पाठऊन देणे जे तेरिखेस पैके द्याल ते तेरीख खती घालोन आह्मास हि लेहोन पाठविजे वाटेतिटेचा विचार पुढे न पावे याकरिता जरूर जाणोन खत पाठविले असे तरी अगत्यारूप पैके पाठविले पाहिजेती विशेष ल्याहावे नलगे त्याचा अभिमान तुह्मास आहे कृपा असो दीजे छ ११ रमजान * हे वीनती
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४२२
१६०९ पौष शुध्द ७ शुक्रवार
अज् रखतखाने राजश्री कृष्णाजी राजे भोसले साहेबू तुलीदयामदौलतहू बजानेबू कारकुनानी हाल व इस्तकबाल व नाटेवारानी व रयानी व कुलकर्णियानी सा। मजकूर बिदानद सु॥ समान समानैन अलफ दर वज बदल इनाम वेदमूर्ति रामेस्वरभट वदल बालभट उपाध्ये आरवीकर यासि पुष्य शुध सप्तमी सुक्रवार मकरसकराती पर्वकालीं धारादत्त केलें भूदार सर्वमान्य नजीकाणी १ एक दिधजी असे तरी सदर्हू जमीन मौजे मलेनूर सा। मजकूर बा। इनाम रतनतीमलालग पैकी कुलबाब कुलकानूची दुमाले करणे दर हर साल ताजा सनदेचा उजूर न करिता तालीक लेहोन घेऊन असल सनद इनामदारमजकुरापासी फिराऊन देणे स्लोक दानपालनयोर्मध्ये दानात् स्त्रेयो नुपालनात् दानात् स्वर्गमवाप्नोती पालनादचुतं पद ॥१॥ स्वदत्ता द्विगुण पुन्य परदत्तानुपालनं परदत्तापहानेर स्वदत्तं निष्फळं भवेत् ॥१॥ शके १६०९ प्रभव नाम सवछर पुष्ये शुध सप्तमी सुक्रवार मोर्तबु सूद
तेरीख ५ माहे रबिलोवल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४२१
१५५५ आश्विन वद्य १
अज रखतखाने राजश्री त्रिंबक पंडित साहेबू दामदौलतहू बजानीबु हुदेदार व मोकदम मौजे वडिगौ ना। देउळगौ कर्याती पाटस पा। पुणे बिदानंद सु॥ अरबा सलासैन अलफ रामेस्वरभट बिन नारायणभट सो। आरवी हुजूर एउनु मालूम केले जे आपणास इनाम जमीन कास रुके -।- देखील मलै दर सवाद मौजे मजकूर प्रज माहाद पाटील ठोबरा मुजेरी मौजे मजकूर देखील नखतयाती ता। ठाणे व ता। देहाये व खर्चपट्टी पायपोसी कुल बाब कुल कानू सालाबाद चालत आहे हाली हुदेदार ताजे खर्द खताचा उजूर करिताती दरीं बाब सरंजाम होय मालूम जाले तरी रामेस्वरभट बिन नारायणभट सो। आरवी यासि इनाम जमीन कास रुके .।. देखील मलै प्रज माहाद पाटील ठोंबरा मुजेरी मौजे मजकूर देखील नखतयाती ता। ठाणे व ता। देहाये खर्चपटी व पायपोसी कुल बाब कुल कानू दिधले असे दुमाले करणे साल गु॥ इनाम भोगवटा नाहीं त्याचा उजूर न करणे सा। गु॥ सदरहू इनाम जे दस्त असेलि ते साले हाली दिवाण अंबरपैकी देणे दर हर साल ताजे खुर्द खता उजूर न करणे तालीक घेउनु असेली इनामदार मजकुरापासी फिराउनु दीजे इनामदार मजकुरासी ता। एईल ते दुमाले करणे मोर्तब सुद (शिक्का षट्कोनी)
तेरीख १४ रबिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४२०
१५५५ आश्विन शुध्द १४
अज् रख्तखाने राजश्री त्रिंबक बलाल बजानेबु हुदेदार व मोकदम मौजे वडिगौऊ नजीक देउळगौऊ परगणे पुणे बिदानंद सु॥ अर्बा सलासीन अलफ बो।रामेस्वरभट बिन नारायणभट जुनारदार सो। आरवी हुजूर येउनु मालूम केले जे आपणास इनाम जमीन कास रुके -।. देखील मलै दर सवाद मौजे मजकूर कर्याती पाटस परगणे मजकूर प्रज माहाद पाटील ठोबरा मौजे मजकूर देखील नख्तयाती व महसूल तालुक ठाणे व तालुक देहाय व खर्चपट्टी व पायपोसी कुलबाब कुलकानू सालाबाद चालत आहे हाली हुदेदार ताजा खुर्द खताचा उजूर करिताती दरीं बाब खुर्द खत होय मालूम जाले तरी रामेस्वरभट बिन नारायणभट जुनारदार यासी इनाम जमीन कास -।- रुके देखील मलै प्रज माहाद पाटील ठोंबरा दर सवाद मौजे मजकूर देखील नख्तयाती व महसूल तालुक ठाणे तालुक देहाय खर्चपट्टी पायपोसी कुलबाब कुलकानूसी दिधलें असे दुमाले करणे दर हर साल खुर्द खताचा उजूर न करणे तालीक घेउनु असेली इनामदारमजकुरास फिसउनु देणे इनाममजकुरावरी ता। जे एईल ते दुमाला करणे मोर्तबु (शिक्का षट्कोनी)
तेरीख १२ माहे रबिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४१९
१५५५ आश्विन शुध्द १२
श्रीसके १५५५ श्रीमुखी नाम छवतछरे आस्विन सुद बारसी सु॥ अर्बा सलासीन व अलफ बिहुजूर देसमुख व मोकदम देहाये का। बायवडे किले फतेमंगल या हुजूर जिवाजी बिन खेलोजी भोसले यास एमाजी बिन धाकोजी काजले लेहूनु दिधले ऐसे जे मौजे निरगुडे मोकदमी आपली मिरासी होती त्यापैकी निमे मोकदमी व चावर पाच आपला तकसीमदार गोदजी व अछतसभटजी तानदेऊ यास दिल्ही होती विकत दिधली होती हालीं मौजे मजकूर खराबसभटजीच्यानें व आपलियाने लावणी नव्हे दुकाल थोर कारबार अवस खावया नाहीं बैल ढोर नाही आपण बहुत भोई पडिर्लो सुजो लागलो यावरी सभाजीने हि तुह्मास वेचले पैके घेउनु लेहून दिल्ही हाली निमे मोकदमी उचे पाच चावर राहेली होती ते आपण आत्मसुखे राजी होउनु तुह्मास विकत दिधली किमती होन ३० समस्त गोत मिलोनु किमती केली ते पैके तुह्मी आपणास दिधले आपण मोकदमी तुह्मास दिधली लेकराचे लेकरी सारी मोकदमी काली व पांढरी मान माननुक तश्रीफ नागर कुल मोकदमी तुह्मास विकत दिधली असे सुखें पिढी दर पिढी लेकराचे लेकरी मिरासी खाणे हा लिहिले सही पेस्तर हर कोन्ही आपला वेलिस्तदार उभा राहेल तो हि आपण निवारणे हे लिहिले सही
(निशाणी नांगर)
गोही
एमाजी व मगाजी बीकोजी व हिरोजी
देसमुख किले फतेमंगल रामाजी बिन कान्होजी
(शिक्का षट्कोनी) मौजे सिरसाफल
(निशाणी नांगर)
बानपाटील मोकदम हिरोजी व कुमाजी
मौजे आसुरणे मोकदम मौजे लाहासुरणे
(निशाणी नांगर) (निशाणी नांगर)
मुजेरी मौजे निरगुडे बहिरजी मोकदम मौजे
जाउजी बिन मलजी लाकडी
पाल्होजी चानगुडा (निशाणी नांगर)
बालगुडा सेटियाजी
थोरवा
खंडोजी बलुते मौजे निरगुडे
बालगुडा बालू चांभार जानू कुंभार
तान्होजी (निशाणी रापी)
चानगुडो पिला बिन माउजी सटवा माहार
चांभार नि. रापी
तिमाजी मु॥ व सेखजी बिदस्तूर रखमाजी
दलजी मोकदम मौजे कान्हो देसकुलकर्णी
उधड का। बायवडे
गणोजी काठा मोकदम
मौजे भिउगौ
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४१८
१५५५ आश्विन शुध्द १२
मजहर बितेरीख रबिलाखर बिहुजूर हाजीर
मजालसी
मोकदम हमशाही
अतोजी अटाले बाकोजी व हिरोजी व रामोजी
मोकदम मौजे लाझफल मोकदम मौजे सिरसाफल
मोकदम देहाये बा। बायवडे (नि. नांगर)
राहुजी व उझरोजी हिराजी व तुकोजी
मोकदम कसबे बायवडे मोकदम मौजे लाहासुरणें
बान पाटील मोकदम मौजे असुरणे मोकदम मौजे कलद
बहिरजी मोकदम मौजे लाकडी गणोजी मोकदम मौजे झिकू
सा। अर्बा सलासीन अलफ श्रीसके १५५५ श्रीमुखी नाम छवतछरे आस्विन सुद बारसी दिवसी महजर जाहाला ऐसे जे जिवाजी बिन खेलोजी भोसले यास एमाजी व मगाजी देसमुख व रखमाजी कान्हो देसकुलकर्णी का। बायवडे किले फतेमगल महजर करुनु दिधला ऐसाजे मौजे निरगुडे का। मा। तेथील मोकदमी तुह्मी विकत घेतली बिता।
निमे मोकदमी व चावर ५ हे संभाजी निमे मोकदमी उणे चावर पाच ते
तानदेऊ याने घेतली होती हाली एमाजी बिन धाकोजी तो
त्याने सुखे राजी होउनु वेचले सुजोन मरो लागला त्याणे आत्मसुखे
पैके घेउनु दिधली बा। लिहिले तुह्मास विकत दिधली किमत बा।
संभाजी लिहिले एमाजी
सदरर्हूप्रमाणे आत्मसुखे मौजेमजकूरची मोकदमी तुह्मी विकत घेतली तेणेप्रमाणे सारी मोकदमी लेकराचे लेकरीं मोकदमी मान माननूक काळी व पांढरी तश्रीफ नागर कुल मोकदमीचा हक्क सेत घर मोकदमीचे सदर्हूप्रमाणे दिधले असे यास पेस्तर हर कोन्ही बिलाहरकती करील तो तो निवारणे हा महजर सही
निशान एमाजी देसमुख
का। बायवडे किले
फतेमंगल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४१७
१५५५ आश्विन शुध्द १०
श्री सके १५५५ श्रीमुख नाम संवत्सर आस्वन सुद दसमी बुधवार त दिसी बीहुजूर एमाजी व मगाजी देसमुख किले फतेमगल या हुजर जिवाजी बिन खेलोजी भोसले यास सभाजी तानदेऊ लिहून दिधले ऐसे जे मौजे निरगुडे तेथील मोकदमी काजलियापासून घेतली
बी॥ता। ता।
गोदजी व माहादजी की १ रामजी बिन राजजी
पासून निमे मोकदमी मोकदम मौजे मा। चावर
५ एकून किमती होनू दाहा
२५ कि १ चावर १५ १०
ए॥ होनू
१० कि १ चावर बा।
एमाजी बा। कीमती होनू चावर
१० दाहा
८॥ = की १ चावर ५
एकून कीमती होनू
एकूण मोकदमी निमे व चावर ५ हे आपण घेतले यावरी तुमचा इलाखा मोकदमीस होता हा आपणास दखल नव्हता हाली गोत मिलोन मुनसिफी करितां तुमचा इलाखा साच जाला आपण मोकदमी घेतली होती ते गोते तुह्मास देवविली आपले पैके तुह्माकडून देवविले ते आपणास दिधले सदरहू मोकदमी तुह्मास दिधली असे तुह्मी लेकराचे लेकरी काळी व पाढरीचे लाजिमे मोकदमीचे तुह्मी खाणे आपणासी मोकदमीसी समध नाही आपणापासी मोकदमीचे कागद होते ते तुह्मास दिले हा लिहिले सही
खत लि॥
गोही
एमाजी व मगाजी देसमूख कसबे दिनपाटील मोकदम मौजे
बलवडे किले फतेमगल असुरणे
(शिक्का षट्कोनी)
बाकोजी हिरोजी मलजी मोकदम मौजे कुभारगौ
रामाजी गौडी मोकदम मौजे (नि. नांगर)
सिरसोफल पा। सुपे
(निशाणी नांगर)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४१६
१५५३ आषाढ वद्य १
अज रखतखाने राजश्री शाहाजी राजे दामदौलतहू बजानेब कारकुनानी हाल व इस्तकबाल व देसमुखानी पा। पाडियापेडगौ व हुदेदारानी व मोकदमानी मौजे जलालपूर पा। मा। बिदानद सु॥ इसने सलासीन अलफ दामोधरभट व रामेस्वरभट बिन नारायणभट सो। आरवी मुदगल हुजूर येऊन मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर एक दर सवाद मौजे मा। देखील नखतयाती ता। ठाणे व ता। देहाये व वेठी बेगारी फर्मासी अवाजेवा कुलबाब व कुलकानू व भोगवटे पेसजी कारकीर्दी दर कारकीर्दी सालाबाद चालिले आहे हाली माहाली कारकून साहेबाचे खुर्द खताचा उजूर करिताती दरी बाब खुर्द खत होए ह्मणौन तरी यास सदरहू इनाम बा। भोगवटे पेसजी कारकीर्दी दर कारकीर्दी सालाबाद ता। सालगु॥ तसरुफाती चालिले असेल तेणेप्रमाणे चालवीजे दर हर साल खता उजूर न कीजे तालीक लेहून घेऊन असली खत फिराऊन दीजे
तेरीख १६ माहे जिल्हेज
जिल्हेज
रुजू सुरुनीवीस
सुरुसुद