लेखांक ४२४
१६१० भाद्रपद वद्य ४
रवा सूद
शके १६१० विभवनाम सवछर भाद्रपद वद्य चतुर्थी सोमवार सु॥ तिसा समानैन अलफ तदिनि खतलिखिते धनको नाम रा। रामेस्वरभट उपाध्ये आरवीकर रिणको नाम रा। कृष्णाजी गंगाधर राजे भोसले आत्मकार्यपरवतसमध्ये तुह्मापासून कर्ज घेतले मुदल उलदुरी नखत रु॥ १०० मा। सेभरी चा। रास यासि मलातर दर माहे दर सदे रु॥ ३
तिनी प्रा। हिसेबी जे मलातर होईल ते व मुदल ऐसे देऊन यासि आन सारिखे नाही हे लिहिले सही
तेरीख १७ माहे जिलकाद मोर्तबु सुदु