लेखांक ४२३
श्री १६१० आषाढ शुध्द १३
सकलतीर्थस्वरूप अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्यराजश्री बालंभट गोसावी यासि
विनंती अपत्यें कृष्णाजी राजे दंडवत उपरी एथील कुशल जाणून स्वक्षेम-वैभवलेखनाज्ञा दिधली पाहिजे विशेष आह्मी सैन्यासि स्वार जालो ते छ १० रोजी पलीपटास पावलो पुढे मजली दर मजली स्वार होऊन जातो ऐसे कळले पाहिजे सैन्यामध्ये खर्चवेचास पाहिजे समयासि न पावे याबद्दल सांप्रत रु॥ ५०० पाचसेयाचे खत लेहोन पाठविले असे खतप्रमाणे पैके अबुलनबी महालदार पाठविला आहे यापासी देऊन पाठऊन देणे जे तेरिखेस पैके द्याल ते तेरीख खती घालोन आह्मास हि लेहोन पाठविजे वाटेतिटेचा विचार पुढे न पावे याकरिता जरूर जाणोन खत पाठविले असे तरी अगत्यारूप पैके पाठविले पाहिजेती विशेष ल्याहावे नलगे त्याचा अभिमान तुह्मास आहे कृपा असो दीजे छ ११ रमजान * हे वीनती