Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री. वैशाख शुद्ध ८ बुधवार शके १७१६
ता. ७।५।१७९४
विनंती विज्ञापना चेनापटणाहुन व्यंकटरामदीक याजकडील अखबारआली ते ओवैसी रवाना केली आहे, अवलोकने मजकुर ध्यानात येईल. उत्तर रवाना व्हावयास आज्ञा जाली पाहिजे, र।। छ पवाल हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १६७ श्री १६२७ मार्गशीर्ष वद्य १
स्वस्ति श्रीराज्याभिषेक शके ३२ पार्थिव नाम संवत्सरे मार्गशीर्ष बहुल प्रतीपदा भोमवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शिव छत्रपति याणी राजश्री आणाजी जनार्दन देशाधिकारी प्रात वाई यासि आज्ञा केली ऐसी जे मौजे इडमिडे प्रात मजकूर हा श्रीसदानंद गोसावीयाचे मठरास इनाम आहे त्यास तुह्मी उपसर्ग देता ह्मणुन विदित जाले तरी गोसावीयाचे मठास गाव दिल्हा असता तुह्मास ऐसी बद राहा वर्तणुक कराया गरज काय याउपरि त्या गावचे वाटेस नव जाणे बोभाट आलिया ताकीद होईल जाणिजे लेखनालंका
रुजु
सुरु सूद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री. वैशाख शुद्ध ८ बुधवार शके १७१६
ता. ७।५।१७९४
विनंती विज्ञापना. कमठाणे येथील आंवराईची रखवाली, बढन असील व येकरामुदौलाखानसामा व नुरमहमदखान करोडा यांस सांगितली. गाडद्याचे पाहार चौकीस आंबराइपाशी ठेविलें आंबे पक्के होतील ते वरचेवर रोज पहचा में अशः ताकीद जाली. कित्येक झाडास आंबे आले नाहीत. त्यास येक कसबी कारागर याने अर्ज केला की ज्या झाडास आंबे नाहीत त्यास बार आणुन अंब्याची फसल बारमाही चालती करतो, त्यावरून त्याजला मसाले वगैरे आंब्याकरितां चारहजार रुपये नुरमहंमदखान करोड्याकडुन देविले. बहलोलखान यांस ताकिद गेली की * चारहजार आंबे बहंग्यासुद्धा तुम्हांकडुन दररोज येत जावे.' याप्रा। ताकद जाली. रा छ ७ माहे षवाल हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री
वैशाख शुद्ध ८ बुधवार शके १७१६
ता. ७।५।१७९४
विनंती विज्ञापना. महंमद अमीरखान आरब यांस नबाबांना बल्हारी कुरगोड वैगरे टिपूकडील नवे तालुके पैकी कितेक गांव कसबे येथे दाखल नाहीं. टिपूकडील तसरुफात याचे तहकीकाती करितां अमीन मुकरर करून पाठविले. खान मार तालुक्यांत जाऊन तहकीकांत कितेक ठिकाणची केली व करतात. परंतु दखल नबाबाकडील अद्याप नाहीं. हल्ली अभीखान अरब यांची अर्जी नत्रावास व दौलास पत्र आले ते छ ४ शवाल गुजराणुन दौला व मीर आलम व इंग्रजाकडाल इष्टवारट वकील यांसी बोलणे जालें, तहकीक समजल्यानंतर याची विनंती मागाहुन लिहिण्यात येईल. र॥ छ. ७ माहे घवाल हे विज्ञापना,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री. वैशाख शुद्ध ८ बुधवार शके १७१६
ता. ७५।१७९४
विनंती विज्ञापना, समशेरजंग यांस नवाबाचा हुकुम जाला की हैदराबादेंत तुमची थोरली हवेली च्यार मिना-याचे रस्त्यांतील आहे. ते हवेली तुह्मी शहरास जाऊन आंतील असबाब काढुन खाली करावी. ' याप्रा सांगितल्यावरून छ २ शवाली समशेरजंग हैदराबादेस गेले. हवेली खाली करून येणार, समशेरजंगाची हवेली दौलास देण्याची योजना व दौलांनी आपली हवेली मीरपोकदअली सिकंदर ज्याहा साहेबजादे यांस आपण द्यावी वैसा बेत आहे. र॥ छ ७ माहे षवाल हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १६६ १६२६ मार्गशीर्ष वद्य ४
(फारसी मजकूर)
जुबदतुल अमासील वल एकरान दत्ताजी देसमुख व शामजी व गंगाजी व गिरमाजी देसपांडे पा। वाई सु॥ १११४ बइनायत इलाही उमेदवार बूदे बाआफियत बाशद पा। मा। खालासे खाले आला ह्मणौन बहुत खुसी हाल जाहला पहिलेपासून जुदायगीदी नव्हती आह्मी च येऊन पोहचत होतो लेकिन गनीमाची धूम बहुत याकरिता सिरिस्ता राहाव्याबदल भीमाजी पंडितासी पाठविले आहे तुह्मी तहसिलेसी मोकरर होऊन तहसील करीत जाणे यामधे तुमचा मुजरा असे थोड सुभता जाहल मणजे अपन हि येऊन पावे जानिजे
पौ छ १७ साबान बा।
मुतुबभाई
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
वैशाख शुद्ध ८ बुधवार शके १७१६
तf. ७६/१७९४
श्रीमंत रावसाहेबांस मामुली हवाल्याचे पत्र,
श्री.
वैशाख शुद्ध ८ बुधवार शके १७१६
ता. ७।५॥१७९४
विनंती विज्ञापना. रमजानचे राजे छ २९ माहे मजाकुर. बुधवारी समाप्त होऊन छ १ माहे शवाल गुरुवारी इदीचा समारंभ इदगापास किलेदार व काजी व मुला यांस पाठऊन कुतबा पढावयाचें जालें, येक प्रहर दोन घटिका दिवसां तोफाचे बार करविले, साहेबजादे मीरपोकदअलीसाहित याद केली, लालबागांत नबाब बरामद होऊन साहेबजादे व दौला कांहीं कांही लोकांच्या नजरा जाल्या, छ १ ते छ५ शवालपर्यंत नित्य ईदीच्या नजरा लोकांकडील होत गेल्या, छ ४ रोज रविवारी आह्मांस ईदीच्या समारंभाकारता बोलाविल्यावरून गेलों, लालबागेमधे नबाबांनी नवा दिवाणखाना तयार केला, तेथे बरामद जाले,
दौलाकडील रिसाला व पागेचे लोकांची नजर दौला खाले उभे राहुन आपले हाते येक येक लोकांस धरून करीत होते, नजरवाले लोकांची दाटी फार होती. आम्हीं जातांच सलाम जाला, नवाबांनी जवळचे वाटेने दिवाणखान्यांत येणे म्हणोन हाताने इशारा केला, त्याप्रा दिवाणखान्यांत येऊन नबा बांनी जवळ बाजूस जागा दाखविली तथे बसलो. येक प्रहरपर्यंत नजरा प्रथम दौलाकडील लोकांच्या, त्यानंतर जोरावरजंगाकडील, त्याजवर सलाबतखानाचे लोक, याप्रा जाव्या. संपुर्ण नजरा होत तोपर्यंत दौला उभेच होते. दोन प्रहराचे अमलांत बरखास जाले. या ७ घवाल हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १६८ ] श्री. १८ आक्टोबर १७४२.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ६९ दुदुभि नाम संवत्सरे कार्तिक शुद्ध प्रतिपदा इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शभुछत्रपति स्वामी यांणीं देशमुख व देशपांडे महालानिहाय यासी आज्ञा केली ऐसी जेः -
वेदमूर्ति राजश्री बाळजोशी बिन दशरथ जोशी, उपनाम, सवदागर, गोत्र शांडिल्य, सूत्र आश्वलायन, सरज्योतिषी महालानिहाय, हे स्वामीचे पुरातन एकनिष्ठ सेवक, यांचे वडिलवडिलापासून तीर्थरूप राजश्री कैलासवासी महाराजाजवळ सेवा निष्ठेनें करीत आले. व हेही स्वामीची सेवा एकरूप निष्ठेनें करीत आहेत. स्वामीविना अन्य जाणत नाहीत. स्वामींनीं जो प्रश्न केला तो याणीं सांगितल्याप्रमाणे स्वामीच्या प्रत्ययास आला व ठाणें शिरोळ ता। अळतें येथील ठाणेस स्वामींनीं परिघ घालून मुक्काम केला होता ते समयी स्वीमींनी यांसी कुरुंदवाडचे मुक्कामीं ठाणें कितके दिवसांत हस्तगत होईल ह्मणून प्रश्न केला. त्यावरून याणीं सिद्धांत करून ज्या दिवशी ठाणें हस्तगत होईल ह्मणवून सांगितलें व लिहून दिल्हें तेव्हां तें त्याप्रमाणें ते दिवशीं ठाणें हस्तगत झालें त्याजवरून स्वामी यांजवर बहुत संतोषी जाहले. यांचें दिवसेदिवस ऊर्जित करून चालविणें हें स्वामीस आवश्यक. यांचेविशीं राणीवसा चौथा वाडा याणीं विनंति केली कीं, बाळजोशी आह्मासन्निध सेवा करित आहेत, यासी राज्यांतील सरज्योतिषणाची वृत्ति करून द्यावी, ह्मणून, त्यावरून मनास आणितां हे ज्योतिषविद्यावंत, सिद्धांतवेत्ते, ज्योतिषविद्यानिपुण, यास्तव स्वामी याजवरी कृपाळु होऊन स्वामीच्या राज्यातील सरज्योतिषपणाचें वतन स्वामींनी यांसी श्रीचें उदक घालून धारादत्त करून दिल्हें असे. या वतनास कानूकायदेयाची मोईन करून दिली असे. गांवगन्ना महालानिहायः -
( पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
वैशाख शुद्ध ३ शक १७१६
ता. २।५।१७९४
विज्ञापना यैसीजे, येथील वर्तमान ताा छ १९ रमाजान रविवार पावेतों अखबार पत्र लेखन करून सेवेसीं पत्राची रवानगी केली. त्याजवरून ध्यानांस आले असेल, सांप्रत येथील वर्तमान छ मजकुरी मीर पोकद अली साहेब जादे यांस पुत्र झाल्याच्या नजरा होऊन च्यार घटिका रात्रीं बरखास जालें. छ २० रोज सोमवारों पांच घटिका दिवसा नव्या बंगल्यामध्ये नवाब बरामत जाले, पागावाले व मीर आलम व रायेरायां, मुनसी वैगेरे इसमाचा सलाम जाला. दौलाची याद केली. ते हजर जाले. कित्येक लोकांच्या नजरा जाल्या. दौला व मीर आलम यांस खिलवत होऊन येक प्रहराचे अमलांत बरखास जाले. कामाव्याचे दारोग्यास हुकुम जाला. जे साहासे कामाठी रायेचुरास पाठऊन माहाबतजंगाचे कोट्यांतील चकमकी बंदुका आणाव्या. मगरबाचे समई मीर पोकद अली वगैरे चौघे साहेबजादे यांजकडे खान्याचे खाने पा. रात्री दौलाची अज व निरखबंद गुजरला. छ २१ रोजी मंगळवारी लाल बागाचा झाडा करून प्रातःकाळी येक घटिका दिवसां नवाब आले, मीर पाकद अली साहेबजादे यांची याद केली. ते पांच घटिका दिवसां हाजर जाले. त्याची नज़र जाली. रात्री जनान्याचा बंदोबस्त होऊन कंचन्याचा नाच जाला. दौलाची अर्जी गुजरली. छ २२ रोज बुधवारी च्यार घटिका दिवसां लालबागामध्ये नवाब आले. जनान्याचा बंदोबस्त जाला. तीन प्रहरास कवलासाहुन आंबे २ ब हो ग्या आल ते गुजरले. रात्री दैलाचा अर्जी व धारणेचा निरखबंद गुजरला. छ २३ रोज गुरुवारी हैदराबादेपर्यंत टपा फुले वगैरे जिन्नस येण्याकरितां बसविला. दिवसा दरबार जाला नाहीं. रात्री दौलाचा अर्जी गुजरली, छ २४ रोज शुक्रवारी तीन वटिका दिवसां नवाब लालबागामध्ये गेले. येक प्रहर पांच घटिका दिवसां मार पोकद अलीसाहेब जादे यांचे मकानास बक्षी बेगम वगैरे बेगमा तेरा रथ गेले. पांचवे दिवसाचा समारंभ जाला. च्यार घटका दिवस शेष राहता मोतियांच्या फुलाच्या बंद्या* व गजरे नवाबांनी साहेब जादे याजकडे पा, मगरबाचे समई बेगमा हवेली आल्या. रात्री दौलाची अर्जी गुजरली. छ २६ रोज मैदवारी दिवसां दरबार जाला नाही. रात्री दौलाची अर्जी व धारणेचा निरखनामा गुजरला. छ २६ रोज रविवारी तीन घटिका दिवसां लालबागामध्ये नवाब बरामद जाले. सैद उमरखान व जंगली वगैरेचा सलाम जाला, लालन हज्यामाची याद केली. तो हजर जाला, हज्यामत होऊन सात घटिकेस बरखास जाले, मीर सुभानअली व झुलफकर अली व तैमूर अली व ज्याहांगिर अली चौघे साहेब जादे व मनसुरजंग वगैरे मंडळीस हुकूम जाला की * षादीचे सुर्खरंगी पोषाग। घेऊन मीर पोकदअली साहेबजादे याचे मकान असावे. फराषखान्याचे दारोग्यास हुकूम होऊन जनाने देवडीपासोन दौलाचे हवेली पावेतों कनाता देऊन बंदोबस्त करावला, तन प्रहरास मीर पोकद अली वगैरे साहेबजादे येऊन हजर जाले. दौलांनीं कारचोबी पोषाग व जवाहीर खाने मीर पाकद अली यांस पाा. येक घटिका दिवस शेष राहतां दौलाचे हवेलीस जनानापुढे पाठऊन बंदोबस्त जाला. नवाब मगरबाचे समई गदीचे हाथीवर स्वार जाले. पिछाडीस सरबुलदजंग होते. मीर पोकद अली घोड्यावर, वरकडही साहेव जादे घोड्यावर स्वार होऊन दौलाचे हवेलीस आले. जनान्याचा बंदोबस्त । होऊन नवाबांनी अडीचसे खाने मिठाई व वस्ने जव्हेर नवरीस फुलें पाने या प्र सरंजाम आणून चढावा चढविला. काजीस बोलाऊन पांच घटिका रात्री मीर पाकद अली यांचा निका दौलाचे नातीशी लागला. त्यानंतर नवाब बाहेर आले. दौलाचे दिवाणखान्यांमध्ये बरामद जाले. दौला व मीर 'आलम व यहेतषामजंग व सरबुलंदजंग वगैरे लोकांच्या नजरा जाल्या. रावजी । आले. सलाम जाला. दौलांने घरबताचा प्याला आपले हाते नवाबास दिल्हा. दौला व रावजीसी बोलणें जालें. कवालाचे गायन ऐकू न येक प्रहर दाहा घाटकेस बरखास्त जाले. जनान्यांत जाऊन शरबत, खोरी व खाना जाला, येक प्रहर पांच घटिका रात्री दिवाणखान्यामध्यें नवाब बरामद जाले. मौर। पोकद अली वगैरे साहेबजादेनी नजरा केल्या. काजीस पांच पार्चे इनामत जाले. दौला व मीर आलम यांसीं बोलणे होऊन दोन प्रहर तीन घटका रात्रीस गदीचे हाथीवर स्वार होऊन रोषनाईने आतषबाजी होत हवेल' दाखल जाले. छ २७ रोज सोमवार दोन घटिका दिवसां नवाब लालबागांत आले. रात्री दौलाची अर्जी गुजरली. छ २८ रोज मंगळवार दोन घटिका दिवसां लालबागामध्ये नवाब आले. जनान्याचा बंदोबस्त जाला. वजीरखान पांचसे स्वार सुद्धां येउन उतरल्याचा अर्ज जाला, रात्री दौलाची अर्जी व धारणेचा निरखनंद गुजरला. छ २९ रोजी बुधवारी दिवसा दरबार जाला नाही. तीन प्रहरास फराषखान्याचे दारोग्यास हुकुम होऊन जनान्याचे देवढीपासोन दौलाचे हवेलीपर्यंत कनाता देउन बंदोबस्त केला. चांदरात येकुणतिसावे तारखसे जाली. चांदरातीच्या तोफा सुटल्या. छ १ शवाली इदीचा सभारंभ होई(ल?) ता. छ २ वाल हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री वैशाख शुद्ध ३ शके १७१६.
ता. २/५/१७९४
विनंती विज्ञापना, वजीरखान वासीम वगैरे वराड तालुकयाचा अमोल तेथून निघोन दर मजल बेदरास छ २९ माहे. रमजानी येऊन उतरला. समागमें पांच स्वार व दोनशें पायदळ दोन हत्ती याप्रमाणे सरंजाम आहे. ताछ २ माहे षवाल हे विज्ञापना.