[ १६८ ] श्री. १८ आक्टोबर १७४२.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ६९ दुदुभि नाम संवत्सरे कार्तिक शुद्ध प्रतिपदा इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शभुछत्रपति स्वामी यांणीं देशमुख व देशपांडे महालानिहाय यासी आज्ञा केली ऐसी जेः -
वेदमूर्ति राजश्री बाळजोशी बिन दशरथ जोशी, उपनाम, सवदागर, गोत्र शांडिल्य, सूत्र आश्वलायन, सरज्योतिषी महालानिहाय, हे स्वामीचे पुरातन एकनिष्ठ सेवक, यांचे वडिलवडिलापासून तीर्थरूप राजश्री कैलासवासी महाराजाजवळ सेवा निष्ठेनें करीत आले. व हेही स्वामीची सेवा एकरूप निष्ठेनें करीत आहेत. स्वामीविना अन्य जाणत नाहीत. स्वामींनीं जो प्रश्न केला तो याणीं सांगितल्याप्रमाणे स्वामीच्या प्रत्ययास आला व ठाणें शिरोळ ता। अळतें येथील ठाणेस स्वामींनीं परिघ घालून मुक्काम केला होता ते समयी स्वीमींनी यांसी कुरुंदवाडचे मुक्कामीं ठाणें कितके दिवसांत हस्तगत होईल ह्मणून प्रश्न केला. त्यावरून याणीं सिद्धांत करून ज्या दिवशी ठाणें हस्तगत होईल ह्मणवून सांगितलें व लिहून दिल्हें तेव्हां तें त्याप्रमाणें ते दिवशीं ठाणें हस्तगत झालें त्याजवरून स्वामी यांजवर बहुत संतोषी जाहले. यांचें दिवसेदिवस ऊर्जित करून चालविणें हें स्वामीस आवश्यक. यांचेविशीं राणीवसा चौथा वाडा याणीं विनंति केली कीं, बाळजोशी आह्मासन्निध सेवा करित आहेत, यासी राज्यांतील सरज्योतिषणाची वृत्ति करून द्यावी, ह्मणून, त्यावरून मनास आणितां हे ज्योतिषविद्यावंत, सिद्धांतवेत्ते, ज्योतिषविद्यानिपुण, यास्तव स्वामी याजवरी कृपाळु होऊन स्वामीच्या राज्यातील सरज्योतिषपणाचें वतन स्वामींनी यांसी श्रीचें उदक घालून धारादत्त करून दिल्हें असे. या वतनास कानूकायदेयाची मोईन करून दिली असे. गांवगन्ना महालानिहायः -
( पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)