श्री. वैशाख शुद्ध ८ बुधवार शके १७१६
ता. ७।५।१७९४
विनंती विज्ञापना. कमठाणे येथील आंवराईची रखवाली, बढन असील व येकरामुदौलाखानसामा व नुरमहमदखान करोडा यांस सांगितली. गाडद्याचे पाहार चौकीस आंबराइपाशी ठेविलें आंबे पक्के होतील ते वरचेवर रोज पहचा में अशः ताकीद जाली. कित्येक झाडास आंबे आले नाहीत. त्यास येक कसबी कारागर याने अर्ज केला की ज्या झाडास आंबे नाहीत त्यास बार आणुन अंब्याची फसल बारमाही चालती करतो, त्यावरून त्याजला मसाले वगैरे आंब्याकरितां चारहजार रुपये नुरमहंमदखान करोड्याकडुन देविले. बहलोलखान यांस ताकिद गेली की * चारहजार आंबे बहंग्यासुद्धा तुम्हांकडुन दररोज येत जावे.' याप्रा। ताकद जाली. रा छ ७ माहे षवाल हे विज्ञापना.