लेखांक १६७ श्री १६२७ मार्गशीर्ष वद्य १
स्वस्ति श्रीराज्याभिषेक शके ३२ पार्थिव नाम संवत्सरे मार्गशीर्ष बहुल प्रतीपदा भोमवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शिव छत्रपति याणी राजश्री आणाजी जनार्दन देशाधिकारी प्रात वाई यासि आज्ञा केली ऐसी जे मौजे इडमिडे प्रात मजकूर हा श्रीसदानंद गोसावीयाचे मठरास इनाम आहे त्यास तुह्मी उपसर्ग देता ह्मणुन विदित जाले तरी गोसावीयाचे मठास गाव दिल्हा असता तुह्मास ऐसी बद राहा वर्तणुक कराया गरज काय याउपरि त्या गावचे वाटेस नव जाणे बोभाट आलिया ताकीद होईल जाणिजे लेखनालंका
रुजु
सुरु सूद बार