Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
कपाळ [कपाल = कपाळ ] (स. मं. )
कप्पा [ कल्पः = कप्पः = कप्पा ] (भा. इ. १८३६)
कफल्लक १ [कफेलक (शुनकफेलक) = कफल्लक (लुच्चा) ]
-२ [ कपालक ] ( कभिन्न पहा )
कवर १ [ कपर्द = कबर्र = कबर ] कबर व कदर्प दोन्ही शब्द संस्कृत कोशांत संस्कृत म्हणून दिलेले असतात; परंतु कबर हा कपर्द शब्दाचा अपभ्रंश स्पष्ट दिसतो.
-२ [ कपिल = कपिर. ल = र. कपिर = कविर = कबिर = कबर ( रा-री-रें ) ] (भा. इ. १८३३)
कंबर [ कमर ( फारसी ) ] (स. मं.)
कबूतर [ कपोतक = कबूतर ( र adventitious by the Persians)
कभिन्न [ कपालक = कभल्लक ( अर्धमागधी ) = कफल्लक. कभल्ल = कभिल्ल = कभिन्न ] काळाकभिन्न म्ह० कापालिकासारखा काळा. ( भा. इ. १८३२ )
कमन [ कमनं = कमन, कमान ] कमन म्ह० वेळू.
तिरकमट्याची कमन म्हणजे तिरकामट्याचा बांकदार वेळू.
कमर [क्रम = करम = कमर (विपर्यय) ] क्रमं वबंध = कमर बांधिली.
कमावणें [ कामय् = कामव = कमाव ] कमावणें म्ह० मिळवणें, पाहिजे असणें, हवें असणें. आयुः कामयमानेन = आयुष्य कमाविणार्याने. द्रव्यं कामयमानेन उद्योगः कर्तव्यः = द्रव्य कमावणार्यानें उद्योग करावा. (भा. इ. १८३४)
कर (प्रत्यय) - नगरकर, पुणेंकर, इंदूरकर, वर्हाडकर, काश्मीरकर इ. इ. इ.
हा कर प्रत्यय कोठून आला ? करणें या धातूपासून कर आला नाहीं हें निश्चित. आला म्हणावा, तर नगर करणारा तो नगरकर असा अर्थ होऊं लागेल. तो अनिष्ट. सबब, कर धातूपासून हा कर प्रत्यय आला नाहीं. हा कर प्रत्यय तेथें राहणारा या अर्थी आहे. संस्कृतांत असा प्रत्यय म्हणजे तास्थ्यार्थी प्रत्यय बुङ् होय. पाटलिपुत्रक:, कांपिल्यकः, नांदिपुरक: इ. इ. इ. ह्या वुङ् प्रत्ययापासून मराष्टी कर प्रत्यय आलेला आहे. वुङ् (क) च्या पुढें र मराठींत केवळ आगन्तुक आहे; परंतु तो महाराष्ट्रीद्वारा आला आहे. अस्मत्क, युष्मत्क यांबद्दल प्राकृतांत आम्हकेर, तुम्हकेर अशीं रुपें येतात. म्हणजे संस्कृत क वद्दल प्राकृत केर होतो. त्या केर चें मराठी कर. (सं.) पाटलिपुत्रक = (प्रा.) पाडळिपुत्तकेर = (म. ) पाडलिपुत्रकर. नांदीपुरकः = नांदूरकेर = नांदूरकर. इ. इ. इ. (भा. इ. १८३३)