Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
करकचून [क्रकचायते] (धातुकोश- करकच पहा)
करकर [ कर्करिका (बारीक खडा) = करकर ] भातांत करकर लागते म्ह० बारीक खडे लागतात.
करकरित [ कर्करित = करकरित ] कर्कर म्ह० स्वच्छ आरसा.
करकरीत [कर्कर (कठिण) पासून निष्टा कर्करित = करकरीत ] कोराकर्करीत = कोराकठीण. (भा. इ. १८३३) करंगळी [करांगुलि = करंगळी ] (स. मं.)
करगोटा [ करकग्रंथिः = करगोटा. करकः = श्रोणी ]
कर जा [ कुर्याः ] ( करूं ये पहा)
करटी [ करोटि = करोटी, करटी, करवंटी ] नारळाची, डोक्याची वाटी, पात्रविशेष. (भा. इ. १८३४)
करडई [करटिका = करडई] करटः म्ह० कुसुंबा.
करडणें [ क्रथनं = करडणें ] (भा. इ. १८३४)
करडा १ [ करट: = करडा] करट: म्ह० खाष्ट पुरुष.
-२ [करटः = करडा] करट म्ह० नीच जातीचा माणूस, नीच, दुष्ट, निर्दय.
-३ [करटक = करडा] करटक हें पंचतंत्रांत शृगालचें नांव आहे. तें त्याच्या करड्या रंगावरून दिलेले आहे. करटक म्ह० करडा हा शब्द पंचतंत्रकालीं करड्या रंगाला संस्कृतांत लावीत असें दिसतें.
-४ [ कटु (tawny ) = कडरु = करुड, करड ( डाडी-डें)] करडा घोडा म्हणजे कद्रु रंगाचा घोडा. (भा. इ. १८३६)
करडुवा [कारंडव = करडुवा (पक्षिविशेष) ] (भा. इ. १८३६ )
करणी १ [ अकरण failure = करणी (अ लोप ) ] करणी करणें म्हणजे failure आणणें कोणालाही मंत्रानें.
-२ [ अकरणिः = करणी ( अ लोप )] अकरणि: हा एक शापशब्द आहे. कथं अकरण्या न लज्जसे = ह्या करणीची तुला लाज कशी वाटत नाहीं. अकरणि: म्हणजे नाश, आंतपाय, ह्रास. त्यानें आपल्या भावाला करणी केली म्हणजे मंत्रादीनीं नाश केला.
करणें [ कल = कर ] कलयति धरित्रीं तृणसमां = पृथ्वीला तृणवत् करतो. तो मला तुछ करतो = स मां तुछं कलयति. तो मला मूर्ख करतो = स मां मूर्ख कलयति. (भा. इ. १८३४)
करणें ( नखें ) अयं नापिक: नखानि करोति = हा न्हावी चांगलीं नखें करतो, म्हणजे नखें काढतो. हा प्रकार मराठीनें संस्कृतांतून वंशपरंपरेनें घेतला आहे. (भा. इ. १८३५)