Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

पिप्परी [ पिप्परी - कौशिकसूत्र २०।२२ प्लक्षोदुंबरः पिप्परीति प्रसिद्धः (!) येथें Bloomfield उद्गार व आश्चर्य कां दाखवितो न कळे. ] (भा. इ. १८३२)

पिवशी बिवशी [ पितृस्वसृ = पिअससा = पिवशी, बिवशी ] ( मावशी बिवशी ह्या सामासिक शब्दांत हा शब्द येतो. स्वतंत्र अस्तित्व सध्यां ह्या शब्दाला नाहीं. लोप झाला आहे.) (स. मं.)

पिवळें हिरवें [ पीतंहरितं = पिवळें हिरवें. हरित = हरिअ = हरिव = हिरव ( वा - वी - वें )] येथें हिरवें म्हणजे पिवळें असा अर्थ आहे. (भा. इ. १८३४)

पिवळोखी [ पीतलक्षिका = पिवळोखी ] पिवळोखी म्हणजे पिवळा रंग.

पिवा [ पीव् to be fat स्थौल्ये = पिवा ] Fat, plump.

पिशवी [ प्रसेवक, प्रसेविका. प्रसेविका = पिसवी = पिशवी ( सा - सी, शी - सें ) प्रसेविका ( leathar vessel ) = पिशवी ]

पिस [ पिशाच्य = पिशाइ = पिसें (वेड ) ] पिसें लागलें म्हणजे पिशाच्य लागलें. (भा. इ. १८३३ )

पिसाव [ प्रस्रावः ] (धातुकोश-पिस ३ पहा)

पिसारा १ [ पिच्छबर्हः = पिसारा ]

-२ [ पिच्छभारः = पिस्सहारा = पिसारा (पाखराचा) ]

पिसारें [ पिच्छाग्रं = पिसारें ( बाणाचें ) ]

पिसावा [ स्त्रु १ गतौ. प्रस्रावः ] (धातुकोश-पिस ३ पहा)

पिस्कारणें [ अपस्किरणं = पिस्करणें, पिस्करणें (प्रयोजक) ] (भा. इ. १८३२)

पिळका [ पुलकः = पिळका. उ = इ ] अंगाला पिळके देत म्हणजे पुलक देत.

पिळणें १ [पीडनं = पीळणें = पिळणें ] स मां पीडयति = तो मला पिळतोय्. (भा. इ. १८३४)

-२ [ पीडन = पीळण = पिळणँ - णें ] ( भा. इ. १८३२)

पी [ प्लीहा (कुक्षिव्याधिः ) = पीआ = पी ] त्याला पी झाली आहे म्हणजे प्लीहानामक कुक्षिरोग झाला आहे. (भा. इ. १८३३)

पीक [ पक्ति: = पीक (पक्वं) ] (ज्ञा. अ. ९ पृ. १८२)

पीठवण [ पृष्टिपर्णि = पीठवण ] पृश्निपर्णि असा शब्द अथर्व संहितेंत येतो. परंतु मराठींत अपभ्रंश पीठवण असा ठकारयुक्त आहे. तेव्हां पृष्टिपर्णि असा ष्टिकारयुक्त उच्चार मराठीच्या पूर्वजांना माहीत होता असें दिसतें. ही पीठवण कोडावर औषध आहे. अथर्वांत पृष्णपणिं कुष्टावर सांगितली आहे. (भा. इ. १८३६)