Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
धमासा १ [ धन्वयासः = धमासा (वनस्पति ) ] (भा. इ. १८३७)
-२ [ धन्वयवासः = धमासा ]
धरण [ धरणः (बांध) = धरण] बिनकमानीचा बांध. (भा. इ. १८३६)
धरती कांप [ धरित्रीकंप = धरतीकांप ]
धरपकड [धृ + प्रकट्= धरपकड ]
धरधरून [ धृ to hold ]
धरम वाढा [ धर्म उपपादय = धरम वाढ ] धर्म उपपादय याचा अर्थ धर्म मिळवा, धर्म जोडा, पुण्य मिळवा, असा मूळचा आहे. आतां धर्म, धरम म्हणजे दान, भिक्षा असा अर्थ होऊन धरम वाढा म्हणजे दान, भिक्षा वाढा असा अर्थ झाला आहे. ( धा. सा. श.)
धरसणें [ धृष् ५ प्रागल्भ्ये. धर्षणं = धरसणें ] (भा. इ. १८३४)
धरसोड १ [ उद्धरोत्सृजा (मयूरव्यंसकादि) = धरसोड ] ( ओसाड पहा )
-२ [ धृतिसृष्टि = धरसोड ]
धर्मलंड [लण्ड् उत्क्षेपणे ] धर्माचें उत्क्षेपण करतो तो. ( ग्रंथमाला)
धवलार [ धवलागार = धवलार (चुनेगच्ची घर)
कवलागार = कवलार (कवलानें शाकारलेलें घर)
तृणागार = तणार ( गवतानें पांजरलेलें घर)] धवलार व तणार हे शब्द ज्ञानेश्वरींत येतात. (ग्रंथमाला)
धवलारें [ धवलगृहं ( राजवाडा) = धवलारें, ढवलारें]
धश्चोट [ अधश्चोदक = धश्चोडअ = धश्चोट ] खालीं पाडून मारणारा. (भा. इ. १८३६)
धस [ धासस् = धस, ढस ] डोंगराची धस, ढस.
धस्स [ साध्वसं = धस्स ( सा लोप ) ] माझ्या हृदयांत धस्स झालें = मे हृदि साध्वसं समभवत्. (भा. इ. १८३५)
धा [ दाहः ] ( डाह पहा )
धाक [ ध्राघ् १ सामर्थ्ये. ध्राघः = धाक] सामर्थ्य, दरारा. ( धा. सा. श. )
धाकधुक [ संकसुक (अस्वस्थ, चंचल) = झांकझुक = धीकधुक. वसिष्ठ संहिता-दहावा अध्याय शेवटील कलम ]