Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

धकणें [ दक्ष् १ वृद्धौ = धकणें, ढकणें ] धकणें म्हणजे निभणें, योग्य ठरणें. गोष्ट धकली पाहिजे म्हणजे निभली पाहिजे. (भा. इ. १८३६)

धकाधकी [ धक्कः धक्किः = धकाधकी. धक्क् १० नाशने ] धकाधकी म्हणजे पीडा, नाश, नुकसान. धक्कः = धोका = झोका (पीडा, नाश) ( धा. सा. श. )

धक्का १ [ धक्क् नाशने धक्कः = धक्का, ढक्का ]

-२ [ धाक: ( ओझें ठेवावयाचा खांब; तक्ता वगैरे) = धक्का ] धक्का म्हणजे माल, माणसें उतरावयाचा मातीचा, दगडाचा किंवा लांकडाचा ताफा वगैरे. (भा इ. १८३६)

धग १ [ इंधनाग्नि = धग्गि = धग ] रसरसणार्‍या कोळशाचा ताव. (स. मं.)

-२ [ दग्ध = धग्ग = धग ] (भा. इ. १८३४)

धगधग [ धकक् (अकच्) = धगधग (अव्यय ) ] घर धगधग जळूं लागलें.

धजणें [ धृज् गतौ ] धजणें = जाणें, जाववणें. ( ग्रंथमाला)

धट १ [ धृष्ट ] ( धट्ट पहा )

-२ [ धट ( तुला ) = धट ] धट म्हणजे परीक्षा. काम धटाला लागलें म्हणजे परीक्षेला लागलें, खरें का खोटें याच्या निर्णयाला लागलें. ( भा. इ. १८३६)

धटाई [ धृष्टता = धटाई, धिटाई ]

धटिंगण [ धटिगणः = धटिंगण ]
धटिन् म्हणजे शंकर, त्याचे गण ते धटिंगण. मराठींत धटिंगण म्हणजे बेपर्वा पुरुष किंवा स्त्री.

धट्ट [ धृष्ट = धट्ट = धट ]

धड [ दृढ = दढ = धड ]
धड हें नाहीं आणि धड तें हि नाहीं.

धडक [ धृष् १० प्रहसने. दधृश = दधृक - धडक ( धार्ष्ट्यानें ). दार्धर्षं = धाडस ] ( धा. सा. श. )

धडधड [ धटधटं ] (धडाधडा पहा)

धडपडणें [अधउत्पतनं = धउडपडणं = धोडपडणें = धडपडणें ] धडपडणें म्हणजे वर खालीं हालचाल करणें. (भा. इ. १८३५)

धडस [ द्रढीयस् comparative = धडस ]

धडाधड, धडाडा [ धटधटं ] ( धडाधडा पहा )

धडाधडा [ धटधटं = धडाधडा, धडाडा (हापटतो), धडाधड, धडधड ]

धडी [ धटी ( जीर्णवस्त्र, वस्त्रविशेष) = धडी (पगडी)] धडी म्हणजे जुनेरें, जुनें वस्त्र. (भा. इ. १८३३)

धडौतें [ धड + ओत = धट + ओत. धट = दांडगें व ओत = विणलेलें ] दांडग्या विणकरीचें लुगडें म्हणजे धडौतें. ( स. मं.)