Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
दुरडी [ दृतिः = दुरडी] दुरडी म्हणजे वेळू वगैरेंचें एक पात्रविशेष. दृति म्हणजे पखाल, बुधली असा एक अर्थ व वेळूचें पात्र असा दुसरा अर्थ.
दुराप [ दुराप = दुराप] यश येणें दुराप आहे.
दुर्भर [ दुः स्मरः = दुर्भर. स्मर = भर ( प्राकृत )]
दुलई [ दुकूलं, दुकूली = दुऊली = दुलई, दूल, दुली ] (ग्रंथमाला)
दुलदुलित [ दुल् १ गतौ ] ( धातुकोश-दुलदुल पहा)
दुवड [ द्विपद = दुवड. त्रिपदा = तिवड. चतुष्पदा = चौवड. (Sans) F पंचपदा = पाचुंदा M. (in मराठी)] दुवाड [ दुविदग्ध ] (द्वाड पहा)
दुह [ दुह्]
दूण [(सं.) द्विगुण = (महाराष्ट्री) दुउण = (मराठी) दूण ] एक दूण दोन, बे दूण चार. (भा. इ. १८३२)
दूणी बीणी [द्वि ह्या संस्कृत शब्दाचीं दुण्णि व बिणि अशीं नपुंसकलिंगी प्रथमेचीं व द्वितीयेचीं रूपें महाराष्ट्रींत होतात ] (भा. इ. १८३२)
दूम [ लूम = डूम = दूम ] दूम म्हण्जे शेंपूट.
देइजे [ कर्तरि विधिलिङ् किंवा कर्मणि विधिलिङ् दद्यात किंवा दीयेत. देइजे = दीजे ] (ज्ञा. अ. ९ पृ. १ )
देखत-चोर [ ( पश्यतो हरः ) पश्यश्चौरः = देखतचोर. देखत षष्टी आहे.] (भा. इ. १८३३)
देणा [ ददानः = देणा ] तो माझा देणा होता = सः मे ददानः आसीत्. गृहाणः = घेणा.
देंट, देंठ [ दण्ड = देंट, देंठ, stem ] (ज्ञा. अ. ९ पृ. १४४)
देदेदेणें [(दा ) ददाति = देदेदेणें ] (भा. इ. १८३६ )
देवघेव [देयग्राह्य - देवघेव] देणें घेणें.
देवचार [देवाचार पहा ]
देवड [ दा-पदं = देवड] घेवडदेवड =घेणेंदेणें, मोबदला.
देवाचार [ देवाप्सरसः = देवअच्चार = देवाचार - देवचार ] कोंकणांत हा शब्द फार ऐकूं येतो. (भा. इ. १८३२)
देवाच्यान् [देवाच्यान्, आईच्यान्, बापाच्यान्, गुरुच्यान् वगैरे शब्द महाराष्ट्रांत जोरानें व आग्रहाने बोलतांना उच्चारितात. ह्या शब्दांचा विग्रह असा-देवाची + आण = देवाच्याण = देवाच्यान्. आईची + आणा=आईच्याण = आईच्यान् इ.इ. इ.] संस्कृतांतल्याप्रमाणें मराठींत संधी ज्या कांहीं थोड्या स्थलीं होतात त्यांपैकीं हें एक स्थळ आहे. (भा. इ. १८३३)