Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
धण ( धाकट) [ धणियबंधणबद्धाओ ( भगवतीशतकजैन ग्रंथ) ] धनिय म्हणजे निबिड, चिक्कण. धणिय = धण
धणधाकट या जोडशब्दांत हा धण शब्द आढळतो. (भा. इ. १८३६)
धणगट [धष्णज् + ट = धणगट ]
धणंतर [ धन्वंतरी = धणंतरी = धणंतर = धनत्तर ] धणंतर, धनत्तर ह्या शब्दाचा अर्थ सध्यां मराठींत समर्थ असा आहे. (भा. इ. १८३२)
धंदा [ धनदा = धनदा = धंदा ] धनदा (वैदिक ` म्हणजे धन देणारा. धन देणारा उद्योग तो धंदा, काम (कर्म), धाम (धर्म), आणि धंदा (धनदा) किंवा काम (इच्छा), धाम ( घर), आणि धंदा (रोजगार). धंदा म्हणजे रोजगार. धंदा मराठी शब्द व रोजगार फारसी शब्द. शब्दांच्या अशा जोड्या मुसलमानांच्या रियाशींत प्रचारांत फार आल्या. कारण फारसी शब्द समजून घ्यावे लागत. त्यामुळें मराठी शब्द व फारसी प्रतिशब्द एकदम बोलत. (भा. इ. १८३३)
धन - फांसे, कवड्या वगैरे टाकून जें दान घेतात त्याला धन म्हणतात. वेदांत धन हा शब्द फांशांच्या दानाला लावलेला आढळतो. धन = धन
तुला चांगलें धन पडलें, तूं चांगलें धन घेतलेंस, असे प्रयोग होतात. धनचाच अपभ्रंश दान. धन = धान = दान. (भा. इ. १८३६)
धनको [ धनकामः ( धने कामः यस्य ) = धनको.
ऋणकामः ( ऋणे कामः यस्य ) = रिणको, ऋणको ] धनको नाम विष्णु, रिणको नाम हरि.
धनत्तर [ धन्वंतरी ] (धणंतर पहा)
धपाटणें, धपाटा [ पट् १० ग्रंथे. अधःपाटन = धपाटणें, धपाटा] धपाटा म्हणजे खालीं पडेसें मारणें. (भा.इ. १८३६ )
धबका [ स्तंबघातः ] (घातुकोश-धबक पहा)
धबधबा [ दवीधू ५ चलने. दबीधावः = घबधबा ] (धातुकोश-धबधव पहा)
धमक [ ध्मांक्ष् १ इच्छायाम्. ध्मांक्षा = धनक ] ( धा. सा. श.)
धमनी १ [ धमनी = धमनी (सं.) ] (स. मं.)
-२ गुजराथेंत दमणी म्हणून एक बैलांची चलाख जात आहे. दमणी बैलांच्या गाड्या दगडगोटे यांच्या वरून इतक्या जलद जातात कीं, त्या घोड्याला हि आटपत नाहीत. धरमपूरचे राजे ह्या गाड्या ठेवतात. ह्या दमणी शब्दावरून मराठी धमनी शब्द झाला आहे. (भा. इ. १८३२)