Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
ठी १ [ स्थिति = ठ्ठिइ = ठी ] (भा. इ. १८३२)
-२ [ स्थितिः = ठिइ = ठी ]
ठीक [ स्थाने (युक्ते) = ठीक ] (भा. इ. १८३४)
ठुलमांडी [ स्थूलमंडिका = ठुलमांडी]
ठुलमांडी म्हणजे पायाची जुडी करून चौक्या वर स्थिर बसणें.
ठेच [हेठ् प्रतिघाते. जेहेठ्य = ठेच ] (धा. सा. श.)
ठेण्या [ स्तेनकः = ठेण्या thief ]
ठेण्या पळाला thief has run away applied to a bug runing away.
ठेप [ टिप् पाठवणें धाडणें. टेप =ठेप ]
जन्मठेप = जन्मभर पाठवणें. (भा. इ. १८३४)
ठेला [ अति + स्था ] (धातुकोश-ठे १ पहा)
ठेली [ स्था १ गतिनिवृत्तौ ] (धातुकोश-ठे २ पहा)
ठेव १ [ स्थेमन् = ठेवं = ठेंव ] कायम ठेवलेला पदार्थ. ( भा. इ. १८३३)
-२ [ स्थेय = ठेव ] (ज्ञा. अ. ९ पृ. १७९)
ठेवणाईत [ स्थापनायत्त =ठवणायत =ठेवणाईत ]
ठेवणें [ स्तेपनं = ठेवणें. स्तेप = फेंकणें ] त्यानें एक ऐसा चेंडू ठेऊन दिलान् म्हणजे फेकलान्. (भा. इ. १८३५)
ठेवाठेवी [ स्थेयास्थेयता. स्थेयः म्हणजे दोन पक्षकारांत निवाडा करणारा न्यायाधीश. कायद्यांतील पारिभाषिक शब्द अह. स्थेय + अस्थेय; तस्य भावः स्थेयास्थेयता ] (ज्ञा. अ. ९ पृ २६ )
ठोकणें (धूम) [ त्वंगति (उड्या मारीत पळणें) = ठोकतो ] धूम ठोकतो म्हणजे धूम पळतो. (भा. इ. १८३६) ठोकणें (लांकूड) [ त्वक्षति (कापणें) = ठोखणें = ठोकणें ] सुतार लांकूड ठोकीत बसला आहे = सूत्रधार: लकुटं त्वक्षति. (भा. इ. १८३६)
ठोठाव [ स्ट्याय स्त्याय = ठोठाव ] (ठाव पहा)
ठो [ तु हिंसायां = ठो देणें. तुः = ठो ] to strike the head against a stone.
ठोठो [ ष्ट्यायः स्यायः = ठावा = ठो. ष्ट्यौ स्यै शब्दे ] ठोठो करणें म्हणजे शब्द करणें.
ठोणा [ स्थूणः = ठोणा (खांब ) ]
ठोंब १ [ स्तुंभ = ठुंब = ठोंब, ठोंब्या ] (भा. इ. १८३३)
-२ [ स्तंवः (मूर्ख) = ठोंब, ठोंब्या ]
ठोंब्या [ स्तुंभ = ठुंब = ठोंब, ठोंब्या ] ठोंब म्हणजे बुद्धीनें थांबलेला, स्तब्ध, मूर्ख. ( भा. इ. १८३५)
ठेला [ स्थूल ] (ठोल्या पहा)
ठोल्या [ स्थूल = ठ्ठोल = ठोल (ला-ली-लें ) स्थुलिक = ठ्ठोल्लिअ = ठोल्य (ल्या, ल्यी, ल्यें ) ] (भा. इ. १८३३)