Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
जाचणें [(जसु ताडने) जासयति = जाचणें ] सासू सुनेस जाचते = श्वश्रूः स्नुषां जासयति. जाच ( नाम ) = जासः (भा. इ. १८३७)
जा जा [द्यै १ न्यक्करणे. द्यायाः = जाजा ] जा जा, गरज नाहीं जा = द्यायाः, कारणं न वर्तते.
जाजू [ जायुः ( औषधं ) = जाजू ] तो कांहीं तरी जाजू करून, रोग बरा करतो. जाजू म्हणजे औषध.
जाड [ जड एव जाड: = (हलक्याच्या उलट ) ] (भा. इ. १८३२)
जाण [ जज्ञान = जणाण = जाण ] जाण म्हणजे ज्याला ज्ञान होऊन गेलें आहे तो. हा शब्द जुन्या मराठींत व सध्यांच्या बोलण्यांत येतो.
जाणता [ जानत ] (सुजाण पहा)
जाणावणें [ ( ज्ञा ) जाज्ञायते = जाणावणें ] वारंवार समजाविणें. (भा. इ. १८३६)
जाणो [ ( जानु + उ ) जानू = जाणो ( आश्चर्यप्रश्ने) यथानु = जणु (औपम्ये) द्याश्रय-१-३२ ]
जातर् [जातु = जातर्] जातु दुग्धं पिब = जातर दूध पी. जातु नाम एकवारम्. (भा. इ. १८३४)
जातीचें-चा-ची [ जात्य = जातिज = जातीच (चा- -ची-चें) ] जात्य म्हणजे कुलिन.
जातें [ यंत्र = जंतं = जातें ]
जादू [ यातु (जादू) = जादू ] यातुधान म्हणजे जादूगार ( ऋग्वेद १-७-३५-१० ) शंकर पंडित यानें हीच व्युत्पत्ति दिली आहे.
जानपछान १ [ ज्ञानप्रत्याज्ञान = जानपच्चाञान = जानपछान ] (भा. इ. १८३४)
-२ [ ज्ञानप्रज्ञान = जानपजाण = जानपछाण-न ]
जानवसा [ यज्ञवास्तु = जञ्ञवासा = जानवसा ] वर्हाडी लग्नरूपी यज्ञ करण्यास ज्या घरांत उतरतात तें घर. (भा. इ. १८३४)
जानोसा [ यानवासक = जानवासक = जानोसअ = जानोसा ] प्रवासांत व्याह्यांना रहावयाला दिलेली जागा. (स. मं.)
जाब [ जल्प् १ व्यक्तायांवाचि. जल्प = जाब ] ( धा. सा. श. )
जाभाड [ जृंभा + अस्थि = जांभा + अठ्ठि = जांभा + हड्डिि = जांभा + हाड = जांभाड = जाभाड ] (स. मं.)
जांभूळ [ जंबूफल = जांभूळ ]