Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
ज
जखड [ जाघट्य ] ( झागड पहा)
जखम [ यक्ष्मन् = जख्खम = जखम ] भयंकर आघात. (भा. इ. १८३४)
जंग ( लढाई), जंगजंग [ जंज् युद्धे (ज् = ग् ) = जंग (लढाई) ] जंगजंग पछाडले.
फारशी जंग संस्कृत जंज् पासून निघाला आहे किंवा त्याचें रूपान्तर आहे किंवा सहोदर आहे.
जगडंबर [ जगदंबर = जगडंबर ]
जगणें [ ( गम्) जंगम् = जगणें ]
जंगम् म्हणजे सातत्यानें जाणें.
जगणें म्हणजें सातत्यानें जगांत असणें. (भा. इ. १८३६)
जघन्य [ जघन्यं ( नीचतमं ) = जघन्य ] त्यानें जघन्य शिव्याशाप दिले म्हणजे नीचतम शिव्या दिल्या.
जंघी [ जघ्निः = जंघी ] हत्यारविशेष.
जंजाळ [ जंज् १ युद्धे ] ती अगदीं आगजंजाळ आहे, म्हणजे लढाऊ भांडखोर आहे. जंजाळ हा शब्द जंज्वल् या क्रियापदापासून हि निघतो.
जजु [ यज्यु ( यजुर्वेदज्ञ ) = जज्यु, जजु ] (भा. इ. १८३६)
जटा [ जटा = जटा ] (स. मं.)
जड [ संहत ( घट्ट ) = जड ] weighty, thick.
जडाव [(जतु) जातव = जाडव = जडाव ] जडावाचा दागिना म्हणजे लाखेनें मिश्र असा सोन्याचा दागिना. (भा. इ. १८३४)
जणु १ [जणु इवार्थे अपभ्रंशे ] उ०-तो जणु आला (भा. इ. १८३२)
-२ [ यथा + नु ] (जाणो पहा)
जती [ यांत्रिकः = जत्तिअ = जती. यति = जती ]
महायांत्रिक म्हणजे ज्योतिषी. जती या शब्दाचे मराठींत दोन अर्थ आहेत. (१) यति व (२) ज्योतिपी. व दोन अर्थ दोन निरनिराळ्या संस्कृत शब्दांपासून आलेले आहेत. (भा. इ. १८३४)
जनाँत [ जनान्त (भोंवतालचा देश ) = जनाँत ] जनाँत काय म्हणतील म्हणजे प्रांतांतील लोक काय म्हणतील. जनाँत हें येथें अनेकवचनी नाम आहे.