Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

जुळें [ युगलं = जुअलं = जुळें ]

जूग [ युग्मं = जुग्ग = जूग ] स्त्रीपुरुषयुग्मं = स्त्रीपुरुषांचे जूग.
सर्पयुग्म = सापाचें जूग.

जूट [ यूथ = जूट ] (भा. इ. १८३६)

जेजे [ जै क्षये द्विरुक्ति = जेजे ] vexation.

जेठा [ जानुष्टयम् = जेठा ] a position in which the kness are bound with the धोतर.

जेठी १ [ योधिष्ठः = जेहिठ्ठ = जेठ. यौधिष्ठि्यन्= जेठी ] a Wrestler.

-२ [ याष्टीक warrior armed with a club = जेठी ] a warrior armed with a club.

-३ [ युद्धिष्ठिर = जहिठ्ठिल = जेठिल = जेठी. जगयुधिष्टिर = जगजेठी ] (भा. इ. १८३२)

-४ [ज्येष्ठिकः ] (ज्येष्ठी पहा)

जेणें [ य + एनेन ] ( एणें पहा )

जेरी १ [ जिरी - जिरीणोति. तनादि गण. जिरी नाश करणें, जखम करणें. जिरी = जेरी ( थकवा, नाश). जेरीस चतुर्थी. ] ( भा. इ. १८३३)

-२ [ जिरि = जेरी. जिरि = जिरिणाति ( found only in the Vedas, जिरि to kill ]

जेवणी [ जेम् १ भोजने. जेमनी = जेवणी ] त्याच्या तोंडाची जेवणी लहान आहे. दोन्ही ओठ मिळून जें जेवण्याचें इंद्रिय होतें त्याला जेवणी म्हणतात.

जेवणें [ ज्यायान् (nomination of ज्यायस्) = जेवणें ] first, excellent, right. जेवणें आंग - first, right side.

जेवि [ यद्वत् ] ( शा. अ. ९, पृ. ८ )

जेव्कार - ब्राह्मणेतर लोक लावण्या गातांना कडव्याच्या शेवटीं तुणतुण्याच्या स्वरावर जिज्जिज्जिज्जि - असें एक पद सातत्यानें म्हणत असतात; आणि थोर लोकांच्या हांकेला होकार देतांना हे लोक जी असा दीर्घ उच्चाराचा शब्द उच्चरितात. हा दीर्घ जी शब्द आर्य, अज्ज, अशा परंपरनें मराठींत साधला आहे, असें बहुतेक वैय्याकरणांचें मत आहे. आर्य, अज्ज शब्दापासून अजा व आर्या शब्दापासून अजी हे शब्द मराठींत आले आहेत हें स्पष्ट आहे. अज्ज शब्दाचा मराठींत दुसरा अपभ्रंश फार झालें तर, ज्ज असा होईल; परंतु जी असा दीर्घ ईकारांत होणार नाही. माझ्या मतें, होकारार्थी जी हा मराठी शब्द जय, जे ह्या परंपरेनें साधलेला आहे. जय हा शब्द मराठी व संस्कृत कवितेंत नमस्कारार्थी येतो. जे हा शब्द प्राकृतांतही नमस्कारार्थी योजीत. गाथासप्तशतीच्या चवथ्या शतकाच्या ३२ व्या गाथेंत हा शब्द योजिला आहेः- 

सूरच्छलेण पुतअ कस्स तुमं अञ्जलिं पणामेसि ।
हासकडक्खुम्मिस्सा ण होन्ति देवाणँ जेव्कारा ॥३२॥

जेव्कारो नमस्कारे देशी, असा टीकेंत जेव्कार म्हणजे जे ह्या शब्दाचा अर्थ दिला आहे. ह्या प्राकृत जे शब्दाचा लावणींतील जिज्जिज्जि हा अपभ्रंश आहे. (सरस्वतीमंदिर श्रावण १८२६)