Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
उपनामव्युत्पत्तिकोश
घाटे - घाट = मर्यादा. देशाच्या मर्यादेवर जकात गोळा करणारा अधिकारी जो तो घाटा. (ग्रंथमाला)
घांटे - घांटिक: (घांट्या पहा)
घांट्या - घांटिकः ( a bard who sings in chorus ringing a bell in presence of God's
images ) = घांट्या ( plu) घांट्ये, घांटे
घांट्ये - घांटिक: ( घांट्या पहा)
घाडगा - घाटघः, घाटघ्नः ( घाटगा पहा)
घाडगे - घाटघ्नः ( a robber in the घाटs ) घाटघे, घाडगे (आडनांव झालें आहे).
घाडघा - घाटघातः=घाडगा, घाडघा (आडनांव मराठी)
घारत - अगारस्थ. ( घरत पहा)
घारपुरे - कारपूरयः (कों) (स)
घुगरे - गुग्गुलिः ( क )
घुले - गुहिलाः (कों )
घोडके - गौरिकिः (स)
घोडमुखे - घोटमुखाः (स)
घोले - गुहलवः (स)
घोल्ये - १ गौहल्याः (स)
च
चवंडे - छमंडः (पोरका) = चवंडा. चवंडे हें ब्राह्मणांत देशस्थांत आडनांव आहे. ( भा. इ. १८३३ )
चांदराते - चंद्रात्मन् = चंदरत = चाँदरात = चांदरते (अनेकवचन). ज्यांच्या घरीं चांदरात झडते ते चांदराते, अशी व्युत्पत्ति हि होईल. (भा. इ. १८३२)
चारणे - चारायणः (स)
चितळे - १ आसिताः = चितळे (अलोप स्वार्थेल.) ( कों ) -२ असित (स)
चित्रे - १ चैत्राः (स)
-२ चैत्रेया: (स)
-३ चित्रकर: ( painter ) = चित्रे (परभू आडनांव ) चित्रक: ( painter) पाणिनि ३-२-९१
चिपळोणकर - ग्रामनामावरून (कों)