Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

कायकीं [ किंकिल = कायकी ] किंकिल शूद्रान्नं भोक्ष्यसे = शूद्राचें अन्न खाशील कायकी !

कारट ( टा-टी-टें) १ [ कृतक: एव कार्तकः. कार्तकः = कारटअ = कारटा. कार्तकी = कारटी. कार्तकं = कारटें ] मानीव पुत्र तो कृतक-निंदार्थी मराठींत कारटा. (भा. इ. १८३४)

-२ [ करट = कारट (ब्राह्मणब्रुव) टा-टें-टी.] ( स. मं. )

कारटा १ [ एकादशादिश्राद्धे करष्टः । (अमरकोशटीका) करटं एकादशादिश्राद्धं करोतीति कारटः । कारट: = कारटा ] स्मशानांतील कारटा.

-२ [ ( संस्कृत) करट: म्ह० अकराव्या दिवसाचें भोजन. त्या भोजनाला जाणारा तो कारटा ] (भा. इ. १८३६ )

-३ [ करटो वाद्यभांडकुविप्रयोः (त्रि. शे.). करट = कारट = कारटें-टा-टी ] (ग्रंथमाला)

कारटीचिरटी [ करंटीचिरंटी = कारटीचिरटी ] (भा. इ. १८३३)

कारण [ करणं = कारण (करण म्ह० व्रतबंधादि कार्य )] आमच्या घरीं कारण निघालें म्ह० व्रतबंधादि कार्य निघालें.

कारभार [ कार्यभारः = कारभार ] कारबार ह्या फारशी शब्दाशीं कांहींएक संबंध नाहीं. स्वत: कारबार हा शब्द संस्कृत कार्यभार ह्या शब्दापासून निघालेला आहे. कारभार हा शब्द नामयाच्या जनांच्या अभंगांत येतो. (भा. इ. १८३४)

कारली [ कारवल्ली = कारली ] ( भा. इ. १८३७)

कारवई [ कार्मता ] ( कारवाई १ पहा )

कारवाई १ [ कार्मता = कार्वई = कार्वाई. कार्मः कर्मशीलः ( अमर ) ] (भा. इ. १८३४)

-२ [ कार्यवाहकता = कारवाई] skilful management

काल १ [ कल्य = कल्ल = काल ] (आज पहा)

-२ [ कल्लि = काल (आजच्या पाठीमागील दिवशीं ) ] (भा. इ. १८३६)

कालथा [ क्लथक: = कालथा (भा. इ. १८३४)

कालवड [ कलभटी = कलहडी = कलअडी = कलवडी = कालवड. येथें ल चा ळ झाला नाहीं ] (भा. इ. १८३२)

कालवण [ कल्यपानं, कल्यपानीयं = कालवण. कल् १० क्षेपे; पा १ पाने ] न्याहारी सोबत पातळ पदार्थ. ( धा. सा. श. )

काला [ कल्य: = काला ] काला म्ह० सकाळचा फराळ. उत्सवांत उपासानंतर दुसर्‍या दिवशीं सकाळीं जो फराळ किंवा जेवण करतात तें. गोपाळकाला.