Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
भाकड [ मर्करा (वांझ) = भक्कडा = भाकड ]
भाकडकथा [ अभ्याख्यातकथा = (अलोप) भाकडकथा. ख्या २ कथने ] अभ्याख्यात falsely accused false, खोटी.
भाकर [ भक्ष्याहार = भक्खार = भाकार = भाकर ] अशिष्ट लोक भाकार असाच उच्चार करितात. मूळ पुल्लिंगाचें मराठीत स्त्रीलिंग झालें आहे. लहान भाकर ती भाकरी. (भा. इ. १८३३)
भाकाढ [ बष्काढ्या = भाकाढ ] विऊन फार महिने झालेली. (उंटाड पहा )
भांग [ भंग = भांग ] (स. मं. )
भागणें [ भज् १ सेवायाम्. भाक्तं (मिळविलें ) = भागलें ] जगला म्हणजे भागलें म्ह• मिळविलें. भागणें (मिळवणें). ( धा. सा. श.)
भागला [अभ्यागतः = भागाअ + ल = भागला-ली-लें ] अभ्यागतः अतिथिः = पाहुणा भागला. चांदोबा, चांदोबा, भागलास का ? = चंद्र चंद्र अभ्यागतोऽसि किम् ?
भांगसळ [ भंगशलाका = भांगसळ ]
भाग होणें - तें-करणें मला भाग झालें = तत्करणं मे भाग्यं अभवत्. भाग्यं अवश्यकं. तेंकरणें हा मराठींत समास आहे.
भाचं-चा-ची [ बहिणिस्स = बहिणिच्च = भणच्च = भंच्च = भांच = भाचं-चा-ची ] भावाला बहिणीचा मुलगा भाचा होतो, बहिणीला भावाचा म्हणजे भावाच्या बायकोचा म्हणजे वहिनीचा मुलगा भाचा होतो. (स. मं. )
भाज [ भार्य्या ] (भाजा पहा)
भाजणें [ ऊन भाजतें, या वाक्यांत जो भाज धातु येती तो संस्कृत टुभ्राजृ दीप्तौ धातूपासून आला आहे. भ्राज् = भाज] (भा. इ. १८३७)
भाजा [ भार्य्या = भाज्जा = भाजा, भाज ] (स. मं.)
भाजी [ (सं. ) भाजी = भाजी (म) ] ( भा. इ. १८३३)
भाजीवाला [ भाजीपाल: = भार्जावाला ]
भाट १ [ भट्ट ( क्षत्रिय व ब्राह्मणी यांचा पुत्र ) = भाट ]
-२ [ भट् परिभाषणे = भाट, बोभाट, बोभावणें ] (ग्रंथमाला)
भाटकन्, भाडदिनि [ चटकर पहा ]
भातकुट्या [ भक्तकुट्टक: = भातकुट्टा इ. इ.] (भा. इ. १८३३)