Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
भडभुंजा १ [ बरीभृंजक: ( भ्राज् to fry ) = भडभुंजा ] a fryer of grain.
-२ [ भृज् १ भर्जने. भरीभृजः = भडीभुंजा = भडभुंजा धान्य भाजणार ( धा. सा. श. )
-३ [ भृष्ट भुंजक = भट्ट भुंजअ = भडभुंजा ] भाजलेलें धान्य तयार करणारा तो भडभुंजा. (भा. इ. १८३३)
भडवा १ [ बटुकः contemptible chap = भडवा ] जा भडव्या get away chap.
-२ [ बटुक stupid fellow = भडवा ] भडव्या you stupid fellow.
भडाग्नी [ वडवाग्नि = बडआग्री = भडाग्नी ]
भडेराक्षस [ अभ्यधिको राक्षसः = भडे राक्षस ] भडे राक्षस म्हणजे राक्षसाहून मोठा राक्षस.
भणभणाट [ बण् १ शब्दे ] ( धातुकोश-भणभण २ पहा)
भतीजा [ भ्रात्रीयः = भतीजा ]
भत्ता [ मृत्य (वेतन, पगार ) = भत्ता ] ज्यादा पगार, वेतन.
भदें [ वपनं भद्राकरणं. भद्र = भद्द = भद ] तुझें भदें करून टाकतों = तुझी हजामत करतों. (ग्रंथमाला)
भद्र्या [ भद्रक = भद्र्या ]
भंपक [ भव्यक = भब्बक = भंपक ] (भा. इ. १८३२)
भपकारा [ अभ्यपक्रम: ] ( धातुकोश-भपकर पहा)
भप्प, भपपकन [ बाष्प = बप्फु = भप्प. भप्प + कन = भप्पकन (जाळ झाला ) ] (भा. इ. १८३२)
भंभाळ [ भंभालि = भंभाळ, बंबाळ ] आगीची भंभाळ म्हणजे आगीच्या धुराचा लोट.
भयाणा [ भयानक = भयाण ]
भयाभीत - हा शब्द रामदासांनीं उपयोजिला आहे.
उ०- " भयाभीत तो अक्षयी मोक्ष देतो," “भयाभीत निश्चित ये स्वस्वरूपी.” या समासाचा विग्रह भय + अभीत असा स्पष्ट आहे. परंतु त्यापासून विपरीत अर्थाची निष्पत्ति होते. तेव्हां भियाभीतः- भयाभीत अशा परंपरेनें हा युधिष्टिर सारखा मराठींत अलुक् समास समजावा. (भा. इ. १८३७)
० भर [भृत = भर] भर उन्हाळा = संमृतः ऊष्णकाल:
भर १ [ भर इति संग्राम नाम ( निघंटु ) ] संग्राम. वादाच्या भरांत तो वाटेल तें बरळतो, येथें भर याचा अर्थ युद्ध, संग्राम असा आहे. (भा. इ. १८३४)
-२ [ मासात् प्रभृति = महिना भर
वर्षात् प्रभृति = वर्षा भर
वर्षप्रभृति = वर्षभर
दिवसप्रभृति = दिवसभर
दिवसात्प्रभृति = दिवसा भर.]