Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
बिचकणें १ [ विजू ३ भयचलनयोः. विजकाम्यति = बिचकणें ] भयानें चलन पावणें. (धा. सा. श.)
-२ [ बिचक् (चक् भिणें) = बिचकणें. (भा. इ. १८३६)
बिछाना [ विशायः ( Turn of sleeping पाणिनि ३-३-३९ ) बिशायनः = बिछाना ] sleeping clothes.
बिजवर [ बिजामातृ one who has purchased a wife = बिजवर a man who marries a second. wife of course with money. द्वितीयवर ह्या शब्दाशीं कांहींएक संबंध नाहीं.
बिजागरी [ बीजार्गला = बिजागरी ]
बिजौरा [ बीजपूरक = बिजौरा ] (भा. इ. १८३४)
बिटा [ वृथा ] (बेटा पहा )
बिडती [ द्विधागतिः, द्विधास्थितिः = बिडती ] दोहोंकडून अडचणीची स्थिति.
बिडलोण [ विड्लवण = बिडलोण ] (भा. इ. १८३६)
बिंडा [ व्द्यंडकः = बेंड्या having two testicles, बिंडा (a proper name in मराठी) ].
बिडाल [ विटाद = बिडाल ] विट म्हणजे उंदीर व अद म्हणजे खाणारा - मूळ संस्कृत शब्द विटाद. त्याचा अपभ्रंश बिडाल. कालान्तरानें विटाद शब्द मागें पडून बिडाल शब्द च संस्कृत म्हणून रूढ झाला.
बित्तंबातमी - बातमी हा बातनी ह्या फारसी शब्दापासून मराठींत आला आहे व बित्तं हा शब्द संस्कृत वृत्त शब्दापासून किंवा विवृत्त शब्दापासून निघाला आहे.
वृत्त = वित्त = बित्त.
विवृत्त = बिवत्त = विअत्त = बित्त.
विवृत्त म्हणजे विशेष वृत्त.
बित्तंबातमी हा मुसलमानी अमलानंतर मराठींत जोडशब्द बनला आहे. बित्तं म्हणजे बातमी. (भा. इ. १८३६)
बिथरणें [ वितर्जन = बिथर्रण = बिथरणें. वितर्ज् गर्हायां । ] (भा. इ. १८३३)
बिदा [ विद्या = विदा ] ही बिदा तुम्ही कोठें शिकलां = इयं विद्या युष्माभिः क्वाधीता ?
बिदा करणें [ वि + दा to grant = विदा करणें ] to grant, to gift.
बिंदुलें [ बिंदु a detached partical. बिंदुल: तस्य भावः बैंदुल्यं detachment वेगळेपणा. बैंदुल्यं = बिंदुलें. बिंद अवयवे to split, to detach ( ज्ञा. अ. ९ )