Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

बापदादे - जन्म देणारे व अन्न देणार, (स. मं.)

बापु [ चातक ह्या अर्थी बापु शब्द महाराष्ट्रींत आहे. ज्ञानेश्वरींत बापिया असा शब्द आहे. हा शब्द संस्कृत पा धातूपासून आला आहे. पा = पिणें. पपु = पिणारा. पपुरेव पापु:. पापु = बापु = बापिया, बापु ] बापु म्ह० चातक. (भा. इ. १८३२)

बापुचातक - ज्ञानेश्वरींत बाप, बापु हा शब्द ह्या अर्थी येतो. त्याचें मूळ प्राकृत बप्पीहो. घनपालाच्या पाइलच्छी खालील शब्द आहेत:-
गहरो वओ या गिद्धो सारंगो चायओ य बप्पीहो ॥ १२६ ॥
ज्ञानेश्वरींतील चातकार्थक जो बापु शब्द तोच मराठींतील पुरुषवाचक प्रेमार्थी बापु शब्द होय. (स. मं.)

बापुडीं [ पापधियः, पाषिष्ठाः ] ( ज्ञा. अ. ९ पृ. ४४ )

बापू [ वापीह ] (बप्पीह पहा)

बापूस, बाप्या [ वप्तृ ] (बाप २ पहा )

बाबजादे = बापाची पोरें ( बिनबापाच्या पोरांहून भिन्न ) जाद हा फारशी शब्द आहे. (स. मं.)

बाबरझाटी [ वर्वरीकः ( कुटिल केशः ) = बाबर ] बाबरझाटी म्हणजे कुटिल केशांचें जुंबाड.

बाबा [ भावः = बाबा ] (भा. इ. १८३४)

बाभूळ [ बभ्रुल = बब्भुल = बाभुळ = बाभूळ = बाभळ ] बभ्रु रंग ज्या झाडाच्या सालीपासून निघतो तें झाड. बाभळी रंग भगव्या रंगाहून निराळा असतो. भगवा रंग जास्त चकाकणार असतो. बाभळी रंग फिकट व निस्तेजस्वी असतो. (भा. इ. १८३३)

वामणबुवा [ ब्राह्मणब्रुवः = बामणबुवा ] (भा. इ. १८३४)

बाय [ वप्त्री ] ( बाई ६ पहा )

बॉय Boy [ पोत = वोअ = वोय = Boy ] (भा. इ. १८३३)

बायको १ [ वामिका + अवावा ] (बाइको पहा)

-२ [ वप्त्री ] ( बाई ६ पहा )

बायडी, बायरूं [वामातरी = बाइरी, बायडी. प्रेमदर्शक बायरूं ]

बायो [ वप्त्री ] ( बाई ६ पहा )

बार [ भार: = बार ] बंदुकींत बार भरणें म्हणजे दारूचें द्रव्य ठासणें.

बारगीर [ वारकीर: ( Porter ) = बारगीर ] वारकीर म्हणजे हमाल.
लाख्या बारगीर, ह्या प्रयोगांतील बारगीर शब्द संस्कृत वारकीर शब्दापासून निघालेला आहे. फारशी बारगीर शब्द निराळा. (भा. इ. १८३६)

बारडी [वार्धिः (वार्+धिः ) = बारढी = बारडी ] पाणी सांठवण्याचें भांडें.