Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश
बावा १ [ वर्मन, गोविंदवर्मन् = गोंदबावा ]
-२ [ भवत् ] (बवा पहा)
-३ [ भगवत् ] ( बोवा पहा )
बावासा [ भवादृशः = बावाइसा = बावासा.
त्वादृशः = तूसा.
मादृशः = मीसा.
कृष्णदृश: = कृष्णसा.
तात्पर्य हा स (सा-शी-सें) प्रत्यय दृश ह्या संस्कृत प्रत्ययापासून आलेला आहे व तो मराठींत वाटेल त्या नामाला लागतो. ] (भा. इ. १८३४)
बाव्हटा १ [ बाहुपुटक: = बाव्हटा ]
-२ [ बाहुअस्थि = बाव्हड्डि = बाव्हटी, बाव्हटा ]
बाव्हली [ पुत्तलिका ] ( बाहुली २ पहा )
बाव्हळ [ बाहुमूल = बाव्हळ ] The base of the arm.
बासट [ सट्ट]
बांसड [ वंशान्धः = बांसड ] टिरी.
बासन १ [ मृज्जनं ( तवा, कढई इ. शिजविण्याचीं भांडीं ) = बासन. ]
-२ [ वसनस्य इदं वासनं. वासन = वासन ] वसन (वस्त्रें ) बांधण्याचें कापड तें बासन. ( भा. इ. १८३३)
-३ [ भाजन = बासन ] बासन म्हणजे भांडें. (भा. इ. १८३४)
बाहणा [ भावना = बाउणा = बाहणा ] बाहाना हा फारसी शब्द निराळा. बाहणा म्हणजे भावकरण.
बाहणें १ [ आवाहनं = बावाहणँ = बाहणें ] बाहणें म्हणजे बोलावून आणणें. हा शब्द जुन्या मराठींत आढळतो. (भा. इ. १८३४)
-२ [ बाह् १ प्रयत्ने. बाहनं = बाहणें ] बाहणें म्हणजे आपलेकडेस आणण्याचा प्रयत्न करणें. ( धा. सा. श. )
-३ [ व्याव्हानं ] ( बाहाणें पहा).
बाहवा [ व्याधिघातः = वाहिहाआ = वाहावा = वाहवा ]
बाहाणें [ व्याव्हानं = बाहाणें, बाहणें ] व्याव्हे म्हणजे निरनिराळ्या माणसांना निरनिराळें बोलावणें. (भा. इ. १८३६)
बाहार १ [ व्याहृति ( मधुर नर्मभाषण) = बाहार ] ह्या गाण्यांत काय बाहार आहे ?
-२ [ व्याभारः = वाहार = बाहार किंवा भारः = बाहार ] (भा. इ. १८३४)