Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

सर्वसामान्य नामादिशब्दव्युत्पत्तिकोश

दहा पांच वर्षे - दहा पांच वर्षे हे शब्द कालासंबंधानें योजतात. ही योजना मराठीनें संस्कृतांतून घेतली आहे, व ती पंचतंत्राच्या कालाइतकी जुनी आहे:-
शिथिलौ च सुबद्धौ च पततः पततो न वा ।
निरीक्षितौ मया भद्रे दशवर्षाणि पंच च ॥ १४६ ॥
पंचतंत्र-द्वितीय तंत्र-कधा ६ (भा. इ. १८३५)

दहावा [ शंभरावा पहा ]

दह्या [ ( दघ्ना भक्षयति ) दाधिकः = दघ्या.
दघ्या, दुघ्या, साखर्‍या, आंबट्या, इत्यादि शब्द चरति ( ४-४-८ ) या पाणिनीय सूत्राप्रमाणें झाले आहेत.

दळिद्र [द्रारिद्र्य ]

दळ्या [ दरिद्रः = दळिद्दो, दळिओ = दळिया = दळ्या़ ] दळ्या म्हणजे भिकार.

दा [ अदात् = देणें. अयछत् = एचणें, वेचणें ] (भा. इ. १८३४)

दाई [ धात्री = धाई = दाई ] (स. मं.)

दागिना [ आघ्यग्नेय property given to bride, at wedding = दागिना ] ornament.

दाघ [ द्राघ् सामर्थ्ये. द्राघः = दाघ ] सामर्थ्य.
उ०-जेणें प्रकाशा कांति चढे । ब्रह्मानंदाचा दाघु मोडे ॥
जें व्रह्माचेनि जीवन सौरभ्यें जोडे । वेधवतिये ॥
ज्ञा. अ. ११-२२०

दाठर [दृढतर = दढअर = दढार = दाठर ] (भा. इ. १८३२)

दांड [ दंडक = दांड, दांडगा ] दंड म्हणजे धृष्ट, गर्विष्ट.

दाडकन् [ द्राड् विशरणे ]

दांडगा [ दंडक ] (दांड पहा)

दाडदाड १ [द्राड् विशरणे ]

-२ [ द्राड् १ अवयवे, विशरणे. द्राडंद्राडं] (धाडधाड पहा)

दांडपट्टा [ दंडपट्टिश ] (भा. इ. १८३७)

दांडा [ दंडक = दंडअ = दांडा (नाकाचा) ] (स.मं.)

दांडी १ [ दंडिका (काठी)= दांडी ] धोत्रें वाळत घालण्याची आडवी काठी किंवा तागडीची काठी.

-२ [ दंडिका = दांडी ] दंड, दंडिका म्हणजे निमुळता कोना कोपरा. कुलाबदांडी म्हणजे कुलाब नांवाचा मुंबई बेटाचा कोपरा.

दाढ, दाढी [ दंष्ट्रा = दढ्ढा = दाढ. दाढेच्या बाहेरील केस = दाढी ] (ग्रंथमाला)