Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
स्थलनामव्युत्पत्तिकोश
पाटगांव - पाठाग्रामं = पाठगांव, पाटगांव.
पाटण - पत्तन = पट्टण ( नाणे मावळांतील राजाची राजधानी) मा
पाटण - पट्ट, पट्टन - पट्टनं. खा नि
पाटणें - पट्ट, पट्टन - पट्टनकं. ३ खा नि
पाटी - पट्टिका (रक्तलोध्र) - पट्टिका. खा व
पाटीबेडकी - पट्ट, पट्टन - पट्टिका = पाटी. खा नि
पाटोदें - पट्टपद्रं. खा नि
पांडरक - पांडर ( नागनाम ) - पांडरकं. खा म
पाडल - पाटली - पाटलं. खा व
पाडलपुर - पाटलीपुत्रकं. २ खा व
पाडसें - पट्टिका ( रक्तलोध्र ) - पट्टिकाकर्ष. खा घ
पाडळद - पाटलीपद्रं. खा व
पाडळदें - पाटलीपद्रकं. खा व
पाडळसें - पाटलीकर्ष. खा व
पाडळी - पाटली = पाडळी (ग्रामनाम). (भा. इ. १८३३)
पाडळी - पाटली - पाटलिका. खा व
पाडळें - पाटली - पाटलकं. खा व
पांडळें - पंडु ( व्यक्तिनाम) - पंडुपल्लं. खा म
पाडा - पद्रक = पड्डअ = पाडा. गुजराथेंत व कोंकणांत क्षुद्र गांवांना पाडा म्हणतात. जांबुळपाडा वगैरे. (भा. इ.१८३३) पाडा म्हणजे लहान गांव.
पाडामुंड - पाटक (गांव) - पाटक: मुंडः. खा नि
पांढरद - पांडर (नागनाम) - पांडरपद्रं. खा म
पांढरी - पांडरा. खा न
पांढरूण - पांडर (नागनाम) - पांडरवनं. खा म
पाणथ - पन्नगकंथं. २ खा इ
पाताळगंगा - पातालगंगा. खा न
पातोंडी - पात (यजुवः शाखाभेद) - पातवंटिका. खा म
पातोंडे - पात ( यजुवः शाखाभेद ) - पातवंटं. २ खा म
पाथरखेड़ें - प्रस्तरखेटं. खा नि
पाथरगांव - प्रस्तरग्रामं (दगडांची समृद्धि असणारें गांव). मा
पाथरजें - प्रस्तरपद्रं. खा नि
पाथरी - प्रस्तर - प्रस्तरिका. खा नि