Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

स्थलनामव्युत्पत्तिकोश

पाखरूण - प्रखर ( गाढव ) - प्रखरवनं. खा इ

पगराव - प्रग्रह (बंदीवान) - प्रग्रहकवहा. खा म

पंचक - पंचक ( रणक्षेत्र). खा नि

पंचिमाळें - पश्चिमपल्लं. खा नि

पंजाणें - पंचक ( रणक्षेत्र) - पंचकवनं. खा नि

पटावें - पट्टिका (रक्तलोध्र ). खा व

पट्टी - पट्टिका (रक्तलोध्र). खा व

पठाड - पृष्ठवाटं. खा नि

पडावद - पट्टि (लोकनाम) पट्ट्यावर्त. खा म

पंढरी - गांव व भोंवतालील शिवार ह्यांना पंढरी व काळी अशा संज्ञा महाराष्ट्रांत प्रसिद्ध आहेत. गांवांतील घरठाणाची जेवढी जागा तेवढी पांढरी; व शेतें, कुरण वगैरे सर्व काळी. पंढरीस मूळची कोष्ट्यांची वस्ती दहा पांच घरांची होती, म्हणून तिला मुळीं पंढरी अथवा पांढरी म्हणत. जेथें सध्यां विठोबाचें देऊळ आहे तेथें पूर्वी शेतें होतीं. ह्या काळींचा जो देव त्याला काळ्या म्हणत. ह्याच काळ्याला सान्निध्यानें पंढरीचा राणा म्हणूं लागले. ही माहिती एका वारकर्‍याने दिलेली आहे.
(महाराष्ट्र इतिहास मासिक श्रावण शके १८२६)

पणजी - पण्याजीवं = पणजी.
पण्याजीवं म्हणजे बाजार, बाजारगांव.
पणजी हें गोवेप्रांतांतील गांवाचें नांघ आहे.

पणास्वर - प्रणव - प्रणवेश्वर = पणास्वर. खा नि

पत्तन - पत्तन हा शब्द संस्कृत नाहीं, प्राकृत आहे. प्रस्थान ह्या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश पट्टण, व त्याचा अपभ्रंश पत्तन असावा. पट्टण व पत्तन ही दोन्ही अपभ्रष्ट प्राकृत शब्द पुढें संस्कृतांत जसेचे तसे घेतले गेले, असें दिसतें. ( भा. इ. १८३२ )

पथराई - प्रस्तर - प्रस्तरावती. खा नि

पथराट - प्रस्तर - प्रस्तराट्ट: ४ खा नि

पथराळें - प्रस्तरपल्लं. खा नि

पथारें - प्रस्तर - प्रस्तरागारं. खा नि

पनाळी - पन्नगारि ( गरुड ) - पन्नगारिका २. खा