Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

स्थलनामव्युत्पत्तिकोश

पेण - प्रकीर्ण याचें प्राकृत पइण्ण. प्रकीर्णग्राम = पइण्णगाम = पेण्णगांव = पेण. जेथील घरें मूळचीं दूर दूर होतीं तें पेण गांव. (महाराष्ट्र इतिहास मासिक श्रावण शके १८२६)

पेथापूर - पीथि (घोडा) - पीथिपुरं. खा इ

पेंबरें - पतिंवरा = पइंबरा = पेंबरा. पेंबरा ज्या गांवांत होती तें पेंबरें. खेडोबाची स्त्री ज्या गांवांत होती तें गांव.

पेशावर - ह्या शहराच्या नांवाचा उच्चार तत्रस्थ लोक पिसाऊर असा करतात व तो च शुद्ध आहे. पिशाच, पिसाच भाषा ज्या प्रांतांत बोलत तो पिसाच देश व तेथील मुख्य शहर तें पिसाचपुर. पिसाचपुर = पिसाअउर = पिसाउर = पेशावर. पुरुषपुर या संस्कृत शब्दापासून पेशावर हा शब्द कित्येक लोक व्युत्पादितात; परंतु तें प्रमाण दिसत नाही. (भा. इ. १८३३)

पैठण - फलस्थान = फलठाण = फलटण. मल्लस्थान = मालठण = मलठण.

बिंबस्थान - बिंबठाण = ठाणें.  प्रतिस्थान = पइठाण = पैठण.
पट्टन ह्या शब्दाशीं पैठणाचा कांहींएक संबंध नाही. ('महाराष्ट्र इतिहास मासिक श्रावण शके १८२६)

पैठाण - सं. प्रा. प्रतिष्ठान. (शि. ता.)

पोखरी - पुष्कर (तीर्थविशेष) - पुष्करिका. ३ खा म

पोहण - पयोष्णि (नदीनाम ) - पयोष्णिकं. खा म

पोहर - पयोहर - पयोहरकं. खा नि

पोहाळा - पृथुकपल्ल: खा नि

पोहोरी - पयोहर - पयोहरिका. खा नि

पौडखोरें - प्रवत् कुहरकं = पौडखोरें. प्रवत् म्हणजे सखल प्रदेश. पौड खोरें म्हणजे सखल खोरें.

पौढाणं - पुंड्र ( लोकनाम ) - पौंड्रवनं. खा म

प्रकाशें - प्रकाशकं. खा नि

प्रतापपुर - } प्रताप. खा नि
प्रतापपुरें - }
प्रस्थ = पत - सोनपत, पानपत, बागपत या दिलांच्या उत्तरेस असणार्‍या शहरांच्या नांवाचें उत्तरपद जें पत तें प्रस्थ ह्या पाणिनिकालीन शब्दाचा अपभ्रंश आहे.
सोनपत = सुवर्णप्रस्थ किंवा शोणप्रस्थ. पानपत = पणप्रस्थ.
पर्ण हें जनपद व तत्रस्थ लोक यांचें नांव असावें. आपर्णानि कुलानि ( गाथासप्तशती ) बागपत = वर्कप्रस्थ.

तसें च इंद्रप्रस्थ ह्या शब्दाचा अपभ्रंश इंदपत असें व्हावें; परंतु हा अपभ्रंश सध्यां प्रचलित नाहीं. कां कीं, तें शहर बुडून नामशेष झालें. दिल्लीला इंद्रप्रस्थ केवळ लक्षणेनें म्हणतात. सोनपत, पानपत, बागपत व इंद्रप्रस्थ हीं चार नगरें कुरुक्षेत्रांत होतीं.
प्रस्थपुरवहान्ताच्च (४-२-१२२) (भा. इ. १८३२)