Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

स्थलनामव्युत्पत्तिकोश

पनाळें - पन्नगारि ( गरुड ) - पन्नगारिकं. खा इ

परखंडी - वांई शहराजवळ परखंदी, परखंडी नांवाचें एक लहानसें खेडें आहे. ह्याचें पूर्वीचें पुरातन नांव प्रगंडी. प्रचें पर व गचा ख होऊन परखंडी असें रूप झालें. प्रगंडी म्हणजे दुर्गप्राकारभितौ शूराणां उपवेशनस्थानम्. हा शब्द भारताच्या शांतिपर्वाच्या अडुसष्टाव्या अध्यायाच्या सत्तेताळिसाव्या श्लोकांत (कुंभकोण प्रत) आला आहे.
प्रगंडीः कारयेत्सम्यगाकाशजननीस्तदा । ह्या परखंडीस जुन्या कोटाचीं अवशेषें अद्याप आहेत. (भा. इ. १८३२ )

परचुली - प्रज (शेतकरी, प्रजा) - प्रजपल्ली = परचुली. खा म

परजपुर - प्रज (शेतकरी, प्रजा) - प्रजपुरं. खा म

परंदवडी - पारदवाटी (पारद गांवाच्या म्लेंछांचें गांव). मा

परसामळ - पलाश-पलाशामलिका-पळस आणि आंवळा. खा व

परसाळें - पर्शु (लोकनाम) - पर्शुपल्लं. खा म

परी - परीवाह (नाला ) - परीवाह = पर्या = परी. खा नि

पर्धाडी - प्रधा (दक्षकन्या) - प्रधावाटिका. खा म

पर्धाड़ें - प्रधा ( दक्षकन्या ) - प्रधावाटं. खा म

पलदी - पाणिनीय गणपाठाच्या चवथ्या अध्यायांत प्रस्थोत्तरपदपलधादिकेपधादण् ( ४-२-११० ) ह्या सूत्रांतील पलद्यादि गण दिला आहे. पलाद्यादि गण बहुवचनी आहे. त्यांतील पहिले तीन शब्द पलदी, परिषद् व रोमक हे आहेत. पैकीं पलदी हा शब्द ग्रामवाचक आहे. हा शब्द महाराष्ट्रांतील ग्रामांचा वाचक सध्यां सांपडतो. खानदेशांत पाचोरा स्टेशनाच्या पूर्वेस व जळगांवच्या दक्षिणेस पहुर गांवाजवळ पलधी, पालधी या नांवाचें गांव सध्यां आहे. हा शब्द पलधी पलदी ह्या पाणिनीय शब्दाचा अपभ्रंश दिसतो. आर्य उत्तरेकडून दक्षिणेकडे आले असतां त्यांनीं जीं गांवें वसविलीं त्यांना उत्तरेकडील आपापल्या गांवांचीं नांवें दिली. जळगांवापासून चार पांच मैलांवर कुसुंबें म्हणून खेड़े आहे. त्याचें नांव कौशांबी ह्या शब्दाचा अपभ्रंश दिसतो. ह्यावरुन असें दिसतें कीं, कुसुंबें व पलधी हीं गांवें कौशांबी प्रांतांत राहणार्‍या आर्यांनीं वसविलीं. (भा. इ. १८३२ )

पळास - प्लक्ष - प्लक्षं. खा व

पष्टाणें - पृष्टहायन (हत्त्ती ) - पृष्टहायनं २ खा इ