Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
४३ आत्मनायक प्रथमपुरुषसर्वनामांची साधनिका
परस्मायक प्रथमपुरुषसर्वनामांच्या साधनिकेला जसा लहानसा उपोद्घात केला, तसा आत्मनायक ऊर्फ स्वस्मायक प्रथमपुरुषसर्वनामांच्या साधनिकेलाही अल्पसा उपोद्घात करणे अवश्य आहे. परस्मायक साधनिकेत असे सांगितले होते की, त् या परोक्ष सर्वनामाला अ हा किंचित्सामीप्यदर्शक शब्द उपसर्ग म्हणून लागतो. आत्मनायक साधनिकेत याच्या उलट प्रकार होतो. सामीप्यदर्शक शब्द उपसर्ग म्हणून सर्वनामाच्या पाठीमागे न लागता प्रत्यय म्हणून सर्वनामाच्या पुढे लागतात. असे प्रत्यय तीन आहेत १) ए, २) अ, व ३) आम् अदस् मधला आद्य अ व एतत् मधला आद्य ए सामीप्यदर्शक आहेत व आम् ही सामीप्यदर्शकच शब्द आहे. आत्मनायक साधनिकेत त् या सर्वनामाला हे अ व ए प्रत्यय लागत. आत्मनायक साधनिकेत दुसरी लक्षात ठेवावयाची बाब म्हणजे वचनांची रूपे प्रत्यय लागून होत नाहीत. उपसर्ग लागून होतात. मागे उत्तमपुरुषसर्वनाम जे हम् त्याची वचनरूपे एका पूर्ववैदिक भाषेत अशीच उपसर्ग लागून झालेली आपण पाहिलीच आहेत. तोच उपसर्गी स्वभाव आत्मनायक साधनिकेत अनुभवास येतो. आत्मनायक साधनिकेत एक वचनाचा उपसर्ग अ आहे, द्विवचनाचा उपसर्ग आ किंवा ए आहेत क आणि अनेकवचनाचा उपसर्ग अन् आहे. तात्पर्य, सामीप्यदर्शक प्रत्यय सर्वनामाच्या पुढे आणि वचनाचे उपसर्ग सर्वनामाच्या मागे या आत्मनायक साधनिकेत लागतात.