Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
कोंकणातली मुसळधार बरसात, त्यात माहुलीच्या रानातली किर्रर्र झाडी, तीत उघड्यात वेढा देऊन दुर्दैवी जमान बसला. पाखरांच्या पंखांवर पावसाळ्यात जेथे शेवाळ उगवते, तेथे देसोर माणसाच्या अंगावर बुरशी चढल्यास नवल काय? जमानचे ह्या मोहिमेत पराकाष्ठेचे हाल झाले. शहाजी मान वाकवील असा रंग दिसेना. गेल्या ज्येष्ठात जुन्नरच्या किल्ल्याला वेढा घातला आणि आश्विन उगवला तरी पाच महिन्यात तो जमानच्या स्वाधीन झाला नाही. माहुलीच्या मानाने जुन्नरचा किल्ला म्हणजे केवळ मैदानी जागा. ती सर होण्याला जर अद्याप पत्ता नाही, तर माहुली चार वर्षातही सर होती तर दिल्लीच्या मोंगलांचे दैव फळफळले असेच म्हणावे लागले असते. अशा संकटात जमान पडून त्याने मध्यस्थांच्या द्वारा शहाजीशी बोलणे लावले. महिना पंधरा दिवस लोटले, तत्रापि शहाजी त्याच्याकडे लक्षच देईना. शेवटी जमानने अखेरचा एक उपाय योजिला. त्याने किल्ल्यातील म्हाता-या बेगमेला चाचपडून पाहिले. तो ते स्थळ नरम दिसले. ती जमानला मिळण्याला राजी झाली. हे असले राज्यही नको व ही सुळावरची पोळीही नको, असे तिला झाले होते. दुस-या एका जुनाट बखरीतील किंवा टिपणातील कोठेतरी व कसातरी उतारा देणारा गचाळ शिवदिग्विजयकार (पृष्ठ ४९) बेगमेचे ह्या वेळचे मुद्याचे उद्गार देतो ते येथे जसेचे तसेच उतरण्यासारखे आहेत. "माहुलीस षण्मास शहा बेगमसुद्धा राहिले. युद्ध करता सहा मास गुदरले. शहाजीमुळे दौलतेचा बखेडा होतो. शहाजी आपला विचार पाहील. मी येते." बेगमेच्या जिवावरती तर शहाजीच्या सा-या उड्या. मूर्तिजा हे मूल तिच्या हातचे बाहुले. ती गेल्यावर तोही जाणारच. तेव्हा, तिला जमानकडे जाऊ न देता शहाजीने जमानला सांगून पाठविले की, आपण मूर्तिजाशहाला तुच्या सुपूर्द करण्यास तयार आहो. हा निरोप ऐकून जमानला साक्षात् अल्ला पावला असे झाले; गेले सहा महिने सोसलेल्या हालांचे ओझे हलके वाटले; आणि शहाजीला कोणतीही शर्त किंवा अट न घालता, त्याच्या इच्छेस येईल तिकडे जाऊ दिले. निजामशहा जमानच्या हातात गेल्यानंतर निजामशाहीही त्याच्याबरोबर शहाजहानच्या हाती गेली. ती द्यावयाला शहाजीची गरजच उरली नाही. जमानने जर शहाजीला जिंकिले असते व किल्ला सर करून बेगमेला व मूर्तिजाला धरले असते, म्हणजे जमानचा जर वरपक्ष असता तर शहाजीला बिनशर्त तो बिलकुल जाऊ न देता. आपली फौज मोडून टाकावी, मोंगली राज्यात किंवा मोंगलांच्या अंकित किंवा मित्रत्वात असलेल्या राज्यात राहू नये, आपले दोन मुलगे व कबिला ओलीस ठेवावा, वगैरे कलमे, मध्यमपक्ष असता तरीही जमानने शहाजीकडून चोपून कबूल करून घेतली असती. येणेप्रमाणे वरपक्षही नसल्यामुळे व मध्यमपक्षही नसल्यामुळे आणि अधमपक्ष असल्यामुळे तसेच शहाजीचा पक्षपाती रणदुल्लाखान हा मध्यस्थ असल्याकारणाने शहाजीला जमानने बिनशर्त जाऊ दिले. शिवाय, बिनशर्त सोडण्याला दुसरेही एक कारण होते. शहाजीचे सैन्य लढाई सुरू झाल्यापासून साक्षात युद्धात बिलकुल जाया झाले नव्हते, जसेचे तसेच शाबूत राहिलेले होते; अद्याप जुन्नर सुद्धा सात किल्ले मोंगलाला दाद न देता शहाजीच्या सैन्याच्या ताब्यात होते आणि पावसाळ्यात शेतावर गेलेले शिपाईगडी मोसमात शहाजी बोलवील तेव्हा येणारे होते. खेरीज, दादाजी कोंडदेवांसारख्या कारभा-यांच्यापाशी फौजेच्या खर्चाकरिता शहाजीने मुबलक द्रव्य ठेविलेले प्रसिद्ध होते. ह्यामुळे शहाजीची कोणत्याच प्रकारे इज्जत घेण्याची जमानला सोय नव्हती. उलट माहुलीच्या रानात व माहुलीपासून पंचवीस मैलांच्या आत शहाजी जमानचीच इज्जत तसे मनात असते तर वाटेल तशी घेता. Evidently he got good terms got good terms म्हणून जदुनाथ सरकार आश्चर्य करतात. खरा प्रकार काय होता याची जर विचक्षणा त्यांनी केली असती तर, तर आपले आश्चर्य अनाठायी आहे, हे त्यांच्या लक्षात येते. The court historian is discreetly silent about the detailsdetails, असे दुसरे आश्चर्य जदुनाथ दर्शवितात. तेही वर दिलेल्या विवेचनाच्या मननाने शमण्यासारखे आहे. Details मध्ये खालील एक कलम असावे. ते असे की, जुन्नर वगैरे सात किल्ल्यातून व निजामशाही प्रांतातील इतर ठिकाणांहून आपले सैनिक व आपली चीजवस्तू व लढाऊ सरंजाम आपल्या सोईप्रमाणे शहाजीने बिनहरकत काढून न्यावा व माहुलीचा किल्ला व इतर सहा किल्ले मोंगलांच्या स्वाधीन न करता आदिलशाही सरदार रणदुल्लाखान याच्या स्वाधीन करावे. ही अट जमानने मान्य केली नसती तर शहाजी माहुलीचा किल्ला मुळीच सोडता ना व जुन्नरादी किल्ले दोनचार वर्षे लढविल्यावाचून रहाता ना. किल्ला शहाजीने आपखुशीने आपण होऊन सोडिला आणि निजामशहाला शहाजीने जमानच्या हवाली आपण होऊन केला. शत्रूच्या सक्तीने हे कृत्य शहाजीने केले नाही. सबब, किल्ला सोडून देण्याच्या शहाजीच्या ह्या कृत्याला capitulation म्हणणे युक्त नसून केवळ evacuation म्हणणे रास्त आहे.