Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

Capitulation capitulation म्हणजे अनन्यगतिक होऊन शरणागत जाणे आणि evacuation evacuation म्हणजे केवळ आपखुशीने सोडून देणे. शहाजी काही शरणागत गेलेला नव्हता. ह्याला दुसरा एक पुरावा मोंगली इतिहासकारांच्या लिहिण्यातच आहे. He was permitted to enter the Bijapur service, या कलमाचा अर्थ असा होता की शहाजी ससैन्य आदिलशहाचा मनसबदार बनला, म्हणजे शहाजीने आपले सैन्य आदिलशाहीत शिरताना बरोबर नेले. अन्यथा एकट्या शहाजीला आदिलशहाचसा काय, पण एखाद्या गावचा पाटीलही ओसरीवर जागा न देता. सशस्त्र सैन्य नेऊ देणे आणि त्या कृत्याला capitulationpitulation म्हणणे म्हणजे उजेडाला अंधार म्हणण्यासारखे आहे. तात्पर्य, जदुनाथ सरकारचे हे लिहिणे अवास्तव आहे. जदुनाथ सरकार यांना शहाजीच्या या सबंध प्रकरणाचा अर्थच कळला नाही. दरबारी खुशमस्क-या मुसलमान लेखकांनी जे लिहून ठेविले त्याचा तारतम्याने उपयोग न करता, सरकारनी केवळ अनुकरण केले असल्यामुळे, त्यांचे शहाजीसंबंधाने लिहिणे टाकाऊ निपजले आहे. शहाजीने हुलकावण्या देऊन जे जमानाला पावसापाण्यातून वणवण करीत राबडत हिंडविले त्याला जदुनाथ hunting of Shahaji म्हणून म्हणतात. मोंगलाला बरसातीत लढावयाला लावून, शहाजहानच्या चार महिन्यात मोहीम संपविण्याच्या योजनेचा शहाजीने चुथडा करून सोडिला, ही बाब ध्यानात न येता, Shahajahan had nothing left to do म्हणून सरकार शेरा देतात तो तर केवळ हास्यास्पद दिसतो. हा शेरा लिहिताना, सर्व कामे व मोहिमा अर्धवट सोडून आग्र्यास आरामात बसण्यास सवकल्यामुळे त्यांची सर्व कामे बिघडत, ही औरंगजेबी टीका, जदुनाथांच्या लक्षात राहिली नाही. जदुनाथ शहाजीला शहा म्हणत नाहीत ह्याबद्दल मात्र त्यांची आम्ही पाठ थोपटतो. नाहीतर शिवाजीला शिवा व संभाजीला संभा म्हणण्यात त्यांनी जसे उर्मट मुसलमान लेखकांचे असभ्य अनुकरण केले तसे शहाजीच्या नावासंबंधानेही त्यास करता आले असते. बहुश: मुसलमान लेखक शहाजीला शाह या एकेरी नावाने संबोधित नसावेत. कारण, शहा या शब्दाचा फारसीत अर्थ राजा असा बहुमानार्थी होतो, लघुत्वदर्शक होत नाही. अन्यथा शिवाजीच्या प्रमाणेच शहाजीचीही व्यवस्था ते लाविल्याशिवाय रहाते ना व सरकार त्यांचे गुलामी अनुकरण केल्यावाचून थांबते ना.