Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

(१) शक १३०० च्या सुमारास बखरी म्हणतात त्याप्राणे भोसले उदेपुराहून दक्षिणेस येऊन पाटस प्रांतात पाटीलक्या करू लागल्यानंतर त्यांचे उपनाव क्षुद्रातिक्षुद्रात सर्व महाराष्ट्रभर पसरले, हा एक पक्ष. आणि (२) वसाहतकाली तीन हजार किंवा अडीच हजार वर्षांपूर्वी भोज ऊर्फ भोसले कुल इतर उत्तरदेशीय कुलांबरोबर महाराष्ट्रात उतरल्यावर त्यांचे उपनाव गायकवाड, काळे इत्यादी इतर शेकडो मराठ्यांच्या उपनावांप्रमाणे क्षुद्रातिक्षुद्रात पसरले हा दुसरा पक्ष. पैकी शक १३०० नंतर भोसले महाराष्ट्रात उतरले हा पहिला पक्ष मान्य धरल्यास, क्षुद्रातिक्षुद्रात सर्व महाराष्ट्रात त्यांचे उपनाम पसरण्याला अवकाश व संभव रहात नाही. का की, शक १३०० त महाराष्ट्रात क्षुद्रातिक्षुद्र अश्या सर्व अठरापगड जाती स्थिर व लखोट बंद बनून हजार पाचशे वर्षे लोटली होती. क्षुद्रातिक्षुद्र जाती लखोटबंद बनल्यावर त्यांच्यात भोसल्यांचे नवीन उपनाम शिरणे अशक्य होते. सबब, दुसरा पक्ष जो भोसले वसाहतकाली अडीच तीन हजार वर्षांपूर्वी दंडकारण्यात उतरल्याचा तो तेवढा नूतन उपनावे क्षुद्रातिक्षुद्रात शिरण्याला संभावक असल्यामुळे स्वीकार्य ठरतो. त्या पुरातन काली अनार्य जातींचा समावेश वर्णव्यवस्थेत शरीरसंबंधोद्भवाने घडून येऊन, आर्यांची उपनामे क्षुद्रातिक्षुद्रात सहजच स्वीकारली जात होती. करता, भोसल्यांचे कूळ महाराष्ट्रात वसाहतकाली इतर कुळांबरोबर आले व इतर कुळांप्रमाणे सर्व महाराष्ट्रभर पसरले, हे विधान विश्वासकक्षेत उतरण्यास योग्य ठरते. शिवाय, भोज ह्या संस्कृत शब्दाचा भोसला हा मराठी अपभ्रंश होण्याला शक १३०० पासूनचा पुढील अल्प काळ अपुरा पडतो. शक १३०० पूर्वी जर हे कूळ उत्तरेस होते तर शक १३०० च्या सुमारास त्या उत्तरेतील कुळाला भोसला हा मराठी शब्द लागणे अशक्य आहे. केवळ भोज या नावानेच ते कुल त्या काळी उत्तरेस मशहूर असले पाहिजे. परंतु रजपुतात शक १३०० च्या सुमारास भोज ह्या उपनामाचे किंवा भोसले या उपनामाचे रजपुतांचे किंवा इतर कोणत्याही जातीचे कूळ नव्हते व सध्याही नाही, अर्थात्, एकच पक्ष स्वीकारावा लागतो. तो हा की, भोसल्यांचे कूळ भोज ह्या नावाने वसाहतकाली अडीच तीन हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात उतरले व दंडकारण्यात उतरल्यावर भोज ह्या नावाचा अपभ्रंश भोसला हे नाव घडण्यात आले आणि ते नाव घडत असता क्षुद्रातिक्षुद्रात अनुलोमशरीरसंबंधाने पसरले. शहाजीच्या मातु:श्रींचे म्हणजे मालोजीच्या बायकोचे नाव जयराम उमाई म्हणून देतो. बृहदीश्वर शिलालेखातही उमाई हेच नाव आले आहे. दीपाबाई हे माहेरचे व उमाई हे ह्या बाईचे सासरचे नाव असावे. भोसल्यांचे गोत्र कुशिक असे जयराम लिहितो.