Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
व मिनजुमले पन्नास लक्ष रुपयाचे अज हजूर मोअला मुबालग तीस लक्ष रुपये काणे, तंबीह अबदालीचे मरहमत जाले व दरसुबे मुलतान व पंजा व थटा२ व भयकर मये फौजदारीहा, व चारमहाल मजारीफ काबील३, व फौजदारी हिसार व संबल व मुरादाबाद ४ व बदाऊंचे चौथ कारणें खर्च सीपाह बंदहाचे मुकरर जाहाली; व दोन हिस्से बराय सरकारवाला दाखल खालसे शरीफे व्हावे आणि एक हिस्सा बराय खर्च सीपाह पातशाही हमराह वजीरुलमुमालीक बहादराचे व हमराह नवाबबहादराचे आहे. करार पावे. आणि सुबेदारी सुबे हजरत अजमेरची५ व फौजदारी नारनोल व सांभर वगैरे फौजदारीहा मुतआलीक त्याचे व सुबेदारी सुबे मुस्तकरुलखोलफत अकबराबाद मये फौजदारी मथुरा वगैरे फौजदारीही मुतआलीक त्याची मये मशरुत सुबेदारीहा व फौजदारीहा व पेशकशात सुबेदारीहा व फौजदारीहा बंदेदरगाहास मुकरर जाहाली व मरमहत जाहाली. करार करितों व शपथपूर्वक कौल करितों कीं, माफक मामूल मशरुत व पेशकशात सुबेदारीहा व फौजदारीहा लायक अहवाल राजहा व
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आणि पन्नास लक्ष रुपयांपैकीं अबदालीच्या पारिपत्याकरितां तीस लक्ष आह्मास पावते झाले, व मुलतान, पंजाब थटा व भकर या सुभ्यांची व त्यांच्या फौजदारीची व चारमहालांच्या सा-याची व हिसार, संबळ, मुरादाबाद व बदाऊंचे फोजदारीची चौथ आमच्या सैन्याच्या खर्चाकडे लावून दिली आहे. आणि दोन भाग हुजूरच्या खालसाकडे लावून दिली आहे. आणि एक हिस्सा वजीरबहादर व नवाबबहाराजवळ असणा-या पातशाही सैन्याच्या खर्चाकडे लावून दिली आहे. येणेप्रमाणें करार केला आहे. आणि पवित्र अजमीर सुभ्याची सुभेदारी व नारनोल व सांभर वगैरेची फौजदारी व त्यांच्या मुतालिकी आणि अकबराबादेची सुभेदारी व मथुरा वगैरे यांची फौजदारी व मुतालिकी व दुस-या शर्तीतल्या सुभेदा-या व फौजदा-या व त्याचे नजराणे सेवकास मुकरर केले आहेत व बक्षिस दिले आहेत. ह्मणून आह्मी शपथपूर्वक कौलकरार करितों कीं ह्या सुभेदरींतील व फौजदारींतील राजांच्या व