Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

 [९९]                                                ।। श्री ।।     ३० सप्टेंबर १७५७.

पे।। छ १५ मोहरम शुक्रवार दीडप्रहररात्र उर्वरित.

श्रीमंत सद्गुणमूर्ति राजश्री रावसाहेबाचे सेवेसी:- आज्ञाधारक कचेश्वर त्रिंबक दि।। नारायणराव आपाजी वकील सा।। नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम त॥ छ १५ मोहरम श्रीमंताचे कृपेकरून कुशल स्वकीय लेखकास आज्ञा केली प।।. विशेष. छ १४ रोजीं दोनप्रहर चार घडी दिवसा निजामअल्ली येऊन नवाब सलाबतजंग वगैरे कुल अमीर गेले होते. निजामअल्लीनीं नजर पाच मोहरा, रुपये ११ सलाबतजंगास गुजाराणिल्या. हें वर्तमान छ १४ चे पत्राब॥ सविस्तर रवाना केलें आहे. विदित जालें असेल छ मजकुरीं दरबार केला. बसालतजंग वगैरे लोक आले. चार घटका खलबत केलें. दरबार बरखास्त झाला. त्याउपरि बसालतजंग निजामअल्लीने डेरियास आले. तेथें इम्रामखान गाडदी, लक्षुमणराव खंडागळे, खोजे रहीमतुलाखान मिलोन खलबत केलें. गाडदी वगैरे यांनीं विस्ताराहि दिधला कीं चार कोस श्रीमंतजीकडे दबाव टाकावा. कांहीं किल्याकडेहि रूख दाखवावा. हें वर्तमान येका मातबराचे जबानीं आलें. सेवेसी विनंति केली. उदइक तहकीक करून लिहिलें जाईल. गुणाजी हरकारे सरकार यांणींहि या मजकुराची बातमी आणिली. लहान मोठें वर्तमान सेवसी वरचेवर लिहील. बहुत काय लिहिणें. हे विनंति.