Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

[४८]                                                                         ।। श्रीराम ।।                                                    ४ मार्च १७५५

 

अल्लाहू

रावसाहेब मुषफिक् मेहरबान् मादने खूबीहाय बेकरान् सलामत्. बादझ् इब्राजे मदारिजे इष्तिआक् व आर्जूए दर्याफ्ते मुलाकाते फिरावां मुसरात के अहुंल् मतालिबस्स मक्षूफे राये इत्तेहाद यक्तिजाय नमूदा मी आयद:- के दर ईं ऐयाम खुदावंदे नियामत् दादासाहेब व किब्ला मद्दजिल्लहू अज सरकारे फैजासारे खुद् चहार सद रुपिया सालाना बनामे बरखुददार लाला धीरधर बतकरूर फरमूदा परवाने तनखाहे मुबलिघ मरकुमआ जां जुमला दुसद रुपिया दरमाहे हाल व दुसद रुपिया दरमाहे आसाढ बनामे रावसाहेब मेहेरबान कलां मिनजुमले एवजे असाव्विर वगैरा मरहेत् फरमूद. बिनाबरां आदमें अजूरदारां पेष आं मुषफिक् मय परवानय तनखा बजिनस् इब्लाघ याफ्त: चं शादीये कारेखैरे आजिजा दरपेषस्त व ईं नियाजमंद अज पुष्तयानी खानेजादे कदीम जनाब फैज माआब पेशवासाहेब व किब्ला मद्दजिल्लहू अस्त; अगर तवज्जुह नमूदा हुंडवी चाहार सद रुपिया लुत्फ फरमायंद एहेतिमाल बर तवज्जुह सामी खाहद बूद. व बराय हरकार व खिदमती के काबिले एहकर बाशद बेतकल्लुफ इमा मीफर्मूदा बाशंद की दर सरंजामे आं सादत मी दानद; व अगर बफौर यक नफर कासीद बर जिम्मय खुद् कबूल नुमायंद व मीदाद बाशंद ता दर इरसाले अखबाराते लवाजिमे बंदगी व इखलास वजारत. बिलफेल रुवे दादे दरबारेवाला वगैरा बिदीं. मिनवालस्त के बंदगाने हजरते कदर कुदरत दर किले मुबारिक नुजूले इजलाल मीदारंद व नवाब वजीरुल्मुक बहादुर गाबेगा बराय मुजराब जनाबेवाला मीरवंद. राजे अंताजी पंडत फिरिस्तादे दादासाहेब व किब्ले मद्दजिल्लहुल आली दर हुजूरे पुरनूर आमदे दर हवेलिये नवाब इसहाकखां मरहूम इकामत वरजीदा व किशनराव बलाल* हमराह् हस्तंद. मुजिबे अम्रे दादासाहेब खुदायगान व नबाबसाहेब तकरुर मीनुमायंद के कुच करदा पेष दादासाहेब तश्रीफ बरंद. चुनाचे नव्वाबेमुअज्ज इले नीज् तय्यारीये कूच मीकुनंद. लाकिन् मरजी नीस्त के बेरुबरायंद व दादासाहेब व किब्ला खुदायगान नोबते हाल बर दर्याये गंग घाटे कमरुद्दिननगर दायरा दारंद जाहिरा मुआमलते साअदुल्लाखान व दुंदेखान व हफीजरहितखान बर पांचद: लक् रुपिया इन्फिसाल् याफ्त. व राव मल्हारजी होळकर बाद अज इनफिसाले मुकद्दमे मोअमलते बहालखां रोहिला जमीदारे कुंजपुरा के करीब पंज् लक रुपिया फैसल गष्ता अज आंजा मुराजय करदा बतारीखे बिस्तु्१०० शेहेरे जमादिउल्अव्वल् सन चहार दर परगने सरधना रसीद इरादे रफ्तने पेषे दादासाहेब व किब्ला मद्दजिल्लहू दारद व नव्वाब अहमदखान बंगष व राय दिलवरसिंग हमराहे राव मुअजिल्लेह् अन्द. इमरोज फर्दा खबरे शामिल् षूदने लष्कर मीरसद. व जनार्जन पंडित दर ईं कूचबंदी मकासेदाराने सहारणपूर व जालापूर वगैरा बमय फौजे बरखास्तह व हुजुरे दादासाहेबो किब्ला रसीदा मुलाअजमत् कुनद् नजीबखां रोहिला बर किनारे दर्याई गंग दरमीयाने मीरापूर व घाट दारानगर बर शकर्ताल यकामत् दारद. व राव मल्हारजीराव अलीदे१०१ खुद् मी गोईंद. व सररिष्तय रुसूखो इखलासे खुद् मुस्तहेकम् दारंद. व मुआमलते खुदरा जाहेरा बतरीखे इखफा फैसल नमूदा; लेकिन मिजाजे वहाजे दादासाहेबो किब्ला बर कशमकशे खाने मरकूम् बूद. अलहाल बाद् अज मुलाकाते राव मल्हारजी व ईं दर्जेमुषरतशवद् व हकीकते जिले लाहोर बिदीं मिनवालास्त: मुण्वके जहानखां व तैमुर सुलतान१०२ पिसरे अहमदखाने अबदालीदर वलदय मरकूम् यकामत् दारंद व बलदय मजकूर दर महासरे सिखानस्त व अतराफे आं सूबा अज् ताख्तो ताराजे आं जमाअत् वैराने मुतलक् शूदा; व मजदुस समदखां फौजदारे चकले सरहिंद के अज तर्फ शाहे अबदालीस्त अज जानिबे सुनाम तालुके अलासिंघ१०३ जाट जमीदारे लखीजंगल बाद अज इन् फिसाले मुकदमे ऊ अज इष्तिहारे आमदे आमदे अफवाजे राव मल्हारजी मुआवत् कर्दा बतारीख दों जमादिउल्अव्वल् सन चार दाखिले चकले मजकूर शूद. तय्यारीए किला व मूरचालबंदी दर शेहेर कर्द बद; व मुलाहजे तमाम अज फौजे दखन मीदाष्त. लाकिन् अज बरगष्ते आमदने राव मोअजइलेह बखाने मरकूम इत्मीनाने खातीर गष्त व शाहे अबदाली अज पेष्तर अज कंदाहर कूच कर्दा बजानिब विलायते इरान् रफ्त:खबरे बाजगष्त न रसीद: चिराक बसबबे बारीदने बर्फ कमतर खबर मीरसद.बतारीख बिस्तूम् शेहेरे जमादिउल्अव्वल् सन चार मोहमद नकीखान् नाम एलची फिरिस्ताद शाहे अबदाली दर हुजूरे मुरसिले मुलाजमते नवाबवजीर हुसूल साख्ता व नाम बराय हरजत नीस आवरदा; अज अकब् मुलाजमत् बहुजूरेवाला खाहद शूद. जवाबो सवाले एलची बशर्ते रसीदने नवेदे आं मेहेरबान व ईमाय दरखास्त अखबारात् व दादने अजूर कासीद इलेह व कलम खाहद आमद. व एहवाले राजपूताना बिदीं नमत् अस्त, के राजे बिजेसिंग अज राहे बदकौलीये थानेजाते शहामत मर्तबद आपाजी शिंदियारा अज् मीरता वगैरा तालुके खुद बरदाष्ता हाला बूदंद. चूनांचे बसूबे हजरत अजमीर पेष नायबे मकासदारे आं जा जमा षूद; बेरूं बरामदा देहाते जोधपुरो मीरतारा बखाक बराबर साख्त: मीसाजंद व राजे माधोसिंग दर जेपूर वतने खुद यकामत दारद व मुबलेचे मुदाविके नविष्तो खान् दर खिदमते दादासाहेबो किब्ला इरसाल मीदारंद. व सूरजमल जाट दर किले भरतपूर यकामत दारंद व दरींविला से लक् रूपिया मसहूबे रूपराम कटारा मोतमीदे खुद्द बहु नूरे दादासाहेबो किब्ला मद्दजिल्लहू मिनजुमले मुआमलते खुद इरसाल दाष्तंद. हकीकते दकन इन अस्त की नवाब बसालतजंग बहादूर नाजिबे सूबे दकन् दर बलदय सूब खुजिष्त बुनियाद औरंगाबाद यकामद दारंद. व पंडत१०४ पर्धान साहेबो किब्ले मद्दजिल्लहू नजदीके तुगा दायरै फौजे फिरोजी मीदारंद. फआमा फीमाबैने नवाब मीर निजामल्लीखान् व मीर्झा मोगलबरादराने नवाब सलाबतजंग व साहेबजादे बुलंद इकबाल रावसाहेब बिस्वासराव मद्दजिल्लहू नजदीके शहागड जंगोजदल बर्रूये कारस्त. व दत्ताजी सिंदिया हमराहे रावसाहेब सरगर्म शूदा अंद, बकिस्मेके खबर अज आं जा मीरसद तहरीर खाहद दर आमद. ज्यादा अय्यामें जमीयत् दायमा बाद. मुकर्रर आं के ब्रह्ममूर्त हरकिशन जुन्नारदार अज पुरोहिताने नियाजमंद अस्त. बराय वजे कारेखैर दारद. जाहिरा बमूजिबे तमस्सुकात बर् जिम्मय अक् सरी अज साकिनाने मैनपुरी वाजिबुल आदा दारद. तव्वको अजतवज्जुहाके सामीस्त के बमूजिबे इजहारे मुषारुन् इलेहे नविष्तेह खुदराबनामे मकासेदारे आं जा परचे नविष्ता बिदेहंद के नकदो सजावली कर्दा जर्रु कर्जे ऊरा वुसूल कुनानीदा बिदेहंद के अज धर्में आं साहेब अज शादीये कारेखैरे सीबिये खुद् फराघत् हुसूल साख्त: शबरोज आशीर्वाद मीदाद बाशद; दर ईं सूरत इमतिनान् बर एहकर खादबूद. ज्यादा अज बंदे जादा बरखुरदारे इक्बालमंद लालाधीरधर सलाम षोख मुष्तजाब बाद. व मुनशीए सरकार रामराम बीरसद. मजमूने खतरा बसमय रावसाहेब रसानीदा जवाबे बासवाब बकलमारंद व अज नामे खुद मुतला साजद.१०५

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अल्लाहू

रावसाहेब प्रिय मेहेरबान अमर्याद गुणाची खाण सलामत् आशीर्वाद. आपल्या सुखदायक दर्शनाची व भेटीची इच्छा फार आहे असें दर्शवून विनंति केली जाते कीं श्रीमंत दादासाहेबांनीं सरकारांतून चारशें रुपये दरसाल व चिरंजीव लाला धीरधरच्या नावें मुकरर केले आहेत व त्याचा परवानाहि येणेंप्रमाणें लिहून दिला आहे कीं त्यापैकीं ह्या महिन्यांत दोनशें व आषाढमहिन्यांत दोनशें रुपये बडया रावसाहेबांच्या नावें असाव्वराच्या ऐवजांतून देण्याचा हुकुम फर्माविला आहे. ह्मणून तनख्याचा असल परवाना देऊन अजुरदार इसम आपणाकडे पाठविला आहे. कारण कीं सेवकाच्या मुलीचें लग्न करावयाचें आहे. सेवक श्रीमंत पेशवेसाहेबांचा खानेजाद गुलाम आहे. ह्मणून कृपा करून चारशें रुपयांची हुंडी पाठविली तर सेवकावर बहुत मेहेरबानी होईल. सेवकाकडून चाहेल ती सेवाचाकरी करून घेण्यास स्वामी समर्थ आहेत. सेवकाचे हातून सेवा घडल्यास मोठा भाग्योदर झाला असे समजेन. आपण एखादा भरवशाचा काशीद पाठविल्यास इकडील खरी बातमी पक्का शोध लावून पाठवून देईन. पातशाही दरबारची हालहवाल येणेप्रमाणें आहे. पातशाहा किल्यांत आहेत. कधीं कधीं नवाब वजीरुल्मुल्क बहादूर पातशाहाला मुजरा करण्याकरितां जातात. दादासाहेबांकडून असलेले अंताजी पंडित मरहूम इसाकखांच्या हवेलींत उतरले आहेत. त्यांच्याबराबर कृष्णराव बल्लाळहि आहेत. श्रीमंतांच्या हुकुमाप्रमाणें नवाबसाहेबांना दादासाहेबांकडे जाण्यास विनंति केली आहे. तेहि तयारी करण्याच्या खटपटींत आहेत. परंतु त्यांनीं जावे अशी मर्जी नाहीं. श्रीमंत दादासाहेबांनीं कमरुद्दिनगराच्या शेजारी गंगेच्या घाटावर डेरे दिले आहेत. साअद्दुल्लाखान, दुंदेखान व हफीजरहिमतखान ह्यांचा मामला पंधरा लाख रुपयाला फैसल झाला आहे. कुंजपुऱ्याचा जबीदार बहालखा रोहिला याच पांच लाख रुपयाचा मामला फैसल झाल्यावर राव मल्हारजी होळकर सन चारच्या जमादिलावलाच्या वीसाव्या तारखेस सरधनाच्या परगण्यास जाणार व श्रीमंत दादासाहेबांना भेटणार. नवाब अहमदखान बंगष व राय दिलवरसिंग त्याच्या बराबर येणार आहेत व लष्करांत आज उद्यां येऊन सामील होतील ह्मणून बातमी आहे. सहारणपूर व जालापूर इत्यादि ठिकाणच्या मोकासदारांना घेऊन बरखास्त फौजेसुध्दां जनार्दन पंडित श्रीमंत दादासाहेबाचे हुजूर पोहोचून सेवेस दाखल होतील. नजीबखान रोहिला गंगाकिनाऱ्यानें शुकर्तालावरती मीरापूर व दारानगरच्या घाटांच्यामध्यें उतरला आहे. राव मल्हारजीला आपले बाप ह्मणून ह्मणतात व स्नेहाचा राबता दृढ करीत आहेत. त्यांनीं आपला मामला अंतस्थ रीतीनें बहुतेक फैसल करून घेतल्यासारखाच आहे. परंतु श्रीमंत दादासाहेबांचे लक्ष खानमजकुराच्या दुटप्पी वर्तनाकडे गेलें आहे. राव मल्हारजीची मुलाखत झाल्यावर सुवेळीं ह्यासंबंधी खलबत होणार आहे. लाहोरकडील बातमी येणेश्रेप्रमाणें आहे. जहानखां व अहमदखां अबदालीचा पुत्र तैमूर सुलतान लाहोरास आहेत. शिखांनीं शहराभोवतीं वेढा दिला आहे. त्यांनीं भोंवतालील प्रदेश लुटून फस्त केला आहे. अबदालीनें नेमलेला सरहिंद चकल्याचा फौजदार अबदुस समदखां राव मल्हारजीच्या फौजा येतात असें ऐकून लखीजंगलचा जमीदार जो अलासिंघ जाट ह्याच्या मुलखांतील सुनाम तालुक्यांतून निघून व तिकडील मुकदम्याचा बंदोबस्त करून सन चार जमादिलावलाच्या दुसऱ्या तारखेस चकले मजकूराला येऊन पोहोंचले व शहरची मोर्चेबंदी करून बसले. दक्षणच्या फौजेचे भय फार वाटत होते. राव मल्हारजी परत जातात हें ऐकून समाधान झालें. शहाअबदाली कंदाहराहून विलायतेस इराणाकडे अगोदरच निघून गेला होता. तो आल्याची वार्ता आली नाहीं. कांकीं बर्फ पडत असल्यामुळें खबर क्वचितच येते. सन चारच्या जमादिलावलाच्या विसाव्या तारखेस अबदालीशहानें पाठविलेला महमद नफीखान नांवाचा पातशाहाकडे एलची आलेला. त्याची व नवाबवजीराची भेट झाली. त्यांनीं पातशहास देण्यास पत्रांची थैली आणीली आहे. पातशहाची मुलाखत लवकरच होणार आहे. तेथें झालेल्या व होणाऱ्या सालजाबाची इत्थंभूत बातमी आपल्याकडून पत्र आल्यावर व आपणाला माहिती हवी असल्यास व काशिदाला मजुरा दिल्यावर पाठविण्याची तजवीज करीन. रजपुतान्याकडील बातमी येणेंप्रमाणें आहे. राजे बिजेसिंग यांनीं मिरता वगैरे आपल्या तालुक्यांतून बदमामली करून श्रीमंत आपाजी शिंद्यांचीं ठाणीं काढून लाविलीं होतीं. ह्मणून त्यांनीं हजरत अजमेरच्या सुभ्यांत नायब मकासेदारांच्या समोर जमून, बाहेर येऊन, जोधपूर व मिरता ह्या तालुक्यांतील गांव जमीनदोस्त करून टाकले व टाकणार राजे माधोसिंग आपल्या वतनाच्या ठिकाणीं जयपुरांत आहेत. तहाप्रमाणें दादासाहेबाकडे पैसे पाठवून देतात. सुरजमल जाट भरतपूरच्या किल्यांत आहेत. त्यांनीं सध्यां आपला मुखत्यार रूपराम कटारा ह्याच्या हस्तें करारापैकीं तीन लाख रुपये पाठवून दिले आहेत.दक्षिणेकडील हकीकत येणेंप्रमाणेंः- दक्षणचा नाजिमसुभा नवाब सलाबतजंग बहादूर सुपीक औरंगाबादेंत आहेत. श्रीमंत पंडित प्रधान यांनीं तुंगेच्या कांठीं फौजेचा तळ दिला आहे. परंतु, नवाब सलाबतजंगाचे बंधू नवाब मीर निजामअल्लीखां व मीरझामोंगल ह्यांची व श्रीमंत विश्वासराव साहेब ह्यांची शहागडाजवळ लढाई चालली आहे. दत्ताजी शिंदे रावसाहेबाबरोबर आहेत. खबर येईल ती लिहून पाठवूं हे विज्ञापना-