Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

 [८४]                                                              ।। श्री ।।                     २६ सप्टेंबर १७५७.

पे॥ छ ११ मोहरम सोमवार अवशीची चार घटका रात्र.

श्रीमंत राजश्री विश्वासराव स्वामीचे सेवेसी: -
विनंति सेवक कृष्णाजी रघुनाथ सा। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल त।। अधिक शुद्ध १३ म॥ शहर जाणून स्वामीनीं निजानंदलेखन आज्ञा करीत असिलें पाहिजे. विशेष. येथील वर्तमान तो राजश्री जीवनराव व हकीम महमदअल्लीखा आज सेवसी येणार. निजामअल्लीचे वर्तमान तो जाफराबादेहून कुच करून काल गिर्नानदीवर आले. तेथून कुच करून दाभाडी अलीकडे येणार. येका दो दिवसांत शहरास दाखल होतील. निजामअल्लीच्या तर्फेनें येक भला मनुष्य येथें सलाबतजंगाजवळ आला होता. कितीकश्या स्वच्छतेच्या गोष्टी सांगितल्या. त्याजवरून यांनी जवाहिरमल मुनसी त्यासमागमें देऊन आज रवाना केलें. निजामअल्लीचा मतलब कीं येथें येऊन यासी भेटावें व चार दिवस राहावें. मग आपल्या तालुकियास जावें. निजामअल्लीसमागमें चार हजार पांच हजार पावेतों स्वार आहेत. लक्ष्मणराव खंडागळे व गिरनोजी आटोळे हे दोघे मराठे समागमें आहेत. ईमराईमखा गाडदी त्यासमागमें आहे. त्याजपाशीं दोन अडीच हजार गाडदी व पंचवीस जर्ब तोफा त्यासमागमें आहेत व सरकारच्या दाहा तोफा इतका सरंजाम त्यासमागमें आहे. कळावे. बहुत काय लिहिणें. कृपालोभ असो दीजे. हे विनंति.