Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
१७५७ तील ७१ पत्रांपैकीं लेखांक ५१, ५२, ५३, ५४, ५५, ५८, ५९, ६०, ६१, ६३, ६६, ६७, ६९, ७०, ७१ व ७२ रघुनाथरावाच्या हिंदुस्थानातील स्वारीसंबंधीं आहेत. लेखांक ५६, ५७ व ६२ श्रीरंगपट्टणच्या स्वारीसंबंधीं आहेत. १७५७ तील बाकीची सर्व पत्रें म्हणजे लेखांक ११९ पर्यंत व सुद्धां शिंदखेडच्या मोहिमेच्या अगोदरचीं आहेत. १७५७ तील लेखांक १२१ हें पत्र बाळाजी बाजीरावाचें आहे. १७५८ तील ५ पत्रांपैकीं लेखांक १२२, १२३, १२४ व १२५ रघुनाथरावासंबंधीं आहेत व लेखांक १३२ गोविंदपंत बुंदेल्यासंबंधीं आहे. १७५९ तील २३ पत्रांपैकीं लेखांक १२६ ताराबाईसंबंधीं आहे, १२७ पेशव्यासंबंधीं आहे, १२८ कावडीसंबंधीं आहे, लेखांक १२९, १३० व १३१ हिंदुपतीसंबंधीं आहेत, लेखांक १३३ पासून लेखांक १४८ पर्यंत व सुद्धां शिंद्यांच्या, रोहिल्यांच्या व अबदालीच्या अंतरवेदींतील झटापटींसंबंधीं आहेत व लेखांक १४९ उदगीरच्या मोहिमेसंबंधीं आहे. १७६० तील १२५ पैकीं लेखांक १५० पासून लेखांक १६६ पर्यंत व सुद्धां सर्व पत्रें उदागीरच्या मोहिमेसंबंधीं व अबदालीशीं शिंदेहोळकरांच्या झटापटी झाल्या त्यासंबंधीं आहेत. १७६० तील बाकींचीं पत्रें पानिपतच्या मोहिमेसंबंधीं आहेत. लेखांक २८७ हें पत्र होळीच्या पोळीच्या तंट्यासंबंधीं आहे. १७६१ तील व १७६३ तील पत्रें पानिपतच्या लढाईनंतरची भाऊसाहेबाच्या तोतयासंबंधीं वगैरे आहेत. येणेंप्रमाणें सुमारें ३०४ पत्रें ह्या ग्रंथांत छापिलीं आहेत.
लेखांक ३ पासून लेखांक २५ सुद्धां पत्रें पैठणास वाण्याच्या दुकानीं मिळालीं. लेखांक २६ पासून (लेखांक ४८ खेरीज करून) लेखांक ५० सुद्धां पत्रें मिरज येथील वासुदेवशास्त्री खरे ह्यांनीं दिलीं. लेखांक १, २, ४८ व लेखांक ५१ पासून लेखांक १२२ सुद्धां पत्रें वाई येथील गोविंदराव भानू यांच्या येथील आहेत. लेखांक १२२ पासून लेखांक ३०४ सुद्धां सर्व पत्रें वाई येथील दादासाहेब येरंडे यांच्या दफ्तरांतील आहेत. दादासाहेब येरंडे यांचे पूर्वज जनार्दनपंत येरंडे ह्यांना नानासाहेबांनीं, गोविंद बल्लाळ, बुंदेलखंडांतील पेशव्यांचे मामलतदार, यांजवर दरखदार म्हणजे तपासनवीस म्हणून पाठविले होते. येरंडे हे १७५७ पासून १७६१ पर्यंत बुंदेलखंड व अंतरवेद ह्या प्रदेशांत होते. त्या अवधींत हीं पत्रें त्यांच्याजवळ आलीं तीं त्यांनीं देशीं परत आल्यावर वांई येथे आपल्या वाड्यांत ठेवून दिलीं. तीं १७६१ पासून १८९७ एप्रिलपर्यंत त्यांच्या वाड्यांतील एका अंबारांत एका कातड्यानें मढविलेल्या पेटा-यांत शाबूत, कोरीकरकरीत, जशींच्या तशींच पडून होतीं. ह्या पेटा-यांत एकंदर सुमारें ७०० पत्रें होतीं; त्यांपैकीं १८२ पत्रें पानिपतच्या मोहिमेसंबंधीं वगैरे आहेत. बाकीं राहिलेलीं पत्रे माधवरावाच्या कारकीर्दीतील हिंदुस्थानांतील घडामोडीसंबंधीं खासगी व जमीन महसुलासंबंधीं आहेत.