Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

राज्य साधून थोडेच दिवसांत तिने चार हजार स्वार फौज जमाकरून त्या फौज निशी चंदासाहेबास कुमक आला येकून चंदासाहेब येक फरांशीस येक अलंखान येक ऐशे तीघीजणही येक होऊन त्रिचनापल्लीवरी युत्धास सन्नत्ध जाहले. तेव्हां महमदअल्लीखान त्रिचनापल्लींत असून आपल्यास केवळ आप्त ऐशे तंजाउरचे महाराजासी सांगून पाठविल्याक्षणी महाराजानी आपला फौजलजार स्वार व पंधराहजार पायदळ भारी तोपखाना व वगैरे देऊन मानाजीराव सरदारासही देऊन कुमकेस पाठविले तैसेच विजयरघुनाथ नायडमानाजी थोडीबहूत आपली फौज देऊन पाटऊन शेंवटी रस्तेची कुमक केले तैसेंच रामनाथपुरचे मखरवोड यानें वर यानी थोडी थोडी कुमक पाठविले त्या खेरीज श्रीरंगपट्टणाचा भारी फौज घेऊन नंदराज दळवाई यानी सैंदखद् ह्मण्णार सरदाराकडून नवाब महंमदल्लीखानानी सांगून पाठविले करितां आपल्या कडील सरदार कत्ती गोपाळराव ह्मण्णारास त्रिचनापल्लीचे किल्यांत पाठऊन नवाब महंमदल्लीखानास कांहीं द्रव्यही देऊन आपण आपले फौजेनिशी महमहल्लीखानास कूमक आले तैसेंच मुरारजी घोरपडे हीं नवाईतासी आपल्या फौजेनिशी कुमकेस आले येणेंप्रमाणें चंदासाहेब महमल्लीखान मुरारजीघोरपडे वगैरे उभयतांचा फौज उतरून युत्धास सन्नत्ध होऊन प्रथम अलंखान ह्मण्णार तंजाउरचा चाकर होता तो मधरेचा मुलुक साधून चंदासाहेबास कुमक आला तो आपले फौजेनिशी इतर फौंजही कित्येक घेऊन तंजाउरचे सरदार मानाजीरायास सन्मुख युत्धास सन्मुख येकयेकांस हातामिळुन गोळीगोळीचे युत्ध होत असतां इंग्रजाकडील सरदार मेजर ह्मण्णार थोड्या फौजेनिशी त्रिचनापल्लीचे किल्यास जाणार वाटेंत मानाजींराव युत्धास सन्मुख होते त्यांस पाहून मेजरमजकूर मानाजीरायापासी येऊन वर्तमान विचारिले रावमजकुरांनीं सकळ पुर्वोत्तराही जाणते केले ते ऐकून घेऊन मेजर मजकुर तोपखाना जवळी येऊन आपल्या हाताने तोफा फिरवून ठेऊन शिर पाहून