Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड नववा (तंजावरचा शिलालेख)
तदनंतरे इंग्रेजसरकार तरफेस अमरशिंगयानी केल्या राज्यभारांत तंजाउर देशाचे राज्यांत अन्याय चालविला आहे करितां देश समग्र इंग्रेज सरकारचे तरफेन केल्यां यांत चांगल्या रीतीनें न्याय करितों ह्मणून महाराजास जाणविले त्या न्याय करणेस महाराजानी अगींकार करून अपला देश इंग्रेजसरकारचे तरफेनें वोपिले. इंग्रेजसरकारच्यानी महाराजाचे निर्मल मनास व निर्मल वर्तणूकेसहीं मान्न महाराजाचे किल्यांत इंग्रेजाचे ठाणें होतें तेही काहडून महाराजाचा किल्ला मोकळा करून दिल्हें तेव्हां महाराज व इंग्रेजसरकारांत हीं येक त्रेटी जाहली त्यांत कित्येक कामास मेस्तर टूरियन् साहेब साहायभूत असून महाराजास युक्त प्रकारें सुलभ केले तदनंतरें इंग्रेजसरकारच्यास दक्षिणप्रांती मरदा ह्मण्णार पाळेगाराचे पारपत्य करणें जरूर पडल्यावेळेस महाराजास जाणविल्या क्षणी महाराजानी आपला देह ओपिल्या वरीहीं आपल्या संरक्षणार्थ थोडे सैन्ये आहे त्यांतहीं शिवण्णा ह्मणार सरदारांबरोबरी समधीराचे स्वार पन्नास व मोगलाई स्वार वीस झुंझार व पादचार अपले समक्ष गाहगशारा ह्मण्णार गलेफाचे बंदुकेचे देखील निशी सहशदा नायर इतक्या फौजेसहीं खर्चास देखील अपणच होऊन रिसिडेंट मेस्ता बळाकूवरनसाहेबा बरोबरी कुमकेस पाठविले सन् १८०१ इसवी माहे. जून तारीख ७ स तदनंतरें पेसजी महाराजानी अपले लग्न होइनाते अगोदरी येक स्त्री सर्व गुणें कडून युक्त योग्य बाल्यवई ऐसे स्त्रीयेस परिग्रह केले होते त्यानीहीं महाराजाचे चितानुरूप वर्तणूक करीत होते तैशी स्त्री दोनदा गर्भ होऊन प्रसवहीं होऊन ते दोनी प्रजाही नष्ट जाहला दुसरे प्रसवामध्येच ते स्त्रीहीं नष्ट जाहल्या करितां त्या स्त्रीचे गुणाधी वयकडून महाराजास ते येक व्यसनास्पदहीं जाहलें परंतूं त्या स्त्रीयेनों आपले अवसान समंई अपल्या नावें येक चांगला धर्म अन्मछत्रादिक व्हावें ह्मणून महाराजास विनविलें होतें त्याचा अंगिकार करून