Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड नववा (तंजावरचा शिलालेख)
म्हणून नावें ठेऊन अणाहीं घालून दोन वर्ष बसला । तेव्हां प्रतापसिंव्ह महाराजास फार संकट पडून फौजस देणेस व आपले खर्चासहीं तुटारा पडल्यामुळें फौज भांडण्यास धजनासें गेल्याकरितां, सातारांत शाहुराजास पत्र लिहून पाठविले तेव्हां शाहूराजानी वीरूबाईचे वोंटीस घातले ते नागपुरी असणार रघोजी भोंसल्यास व फतेशिंगासहीं साठ हजार स्वार देऊन पाठविले । त्यानी अति त्वरेनें घाट उतरले । ते वर्तमान ऐकतांच सबरअल्लीखान् मुलूख सोडून त्रिचनापल्लीस पळाला । उपरि राजास मुलुक मोकळा जाहाला । त्यानंतरें रघोजी भोंसले व फतेसिंग उभयतां त्रिचनापल्लीस येऊन समोर मधरेंतून आला तो चंदासाहेबाचा भाऊ बरबदरअलीखानासही मारून, चंदासाहेबास धरून कैद करून त्रिचनापल्ली किल्ला घेतला। तेव्हां प्रतापसिंव्ह महाराजानी त्याकडे आपलें अमात्य अण्णपा शेटक्यास पाठविले । त्यानी जाऊन रघोजी भोंसले व फत्तेसिंगाची भेट घेतांच त्यानी त्रिचनापल्लीचा किल्ली ओपून घ्या म्हणाले; तेव्हां राजानी त्याचा अंगिकार करिनासें सांगून पाठविल्यावरून रघोजी भोंसले, फतेसिंगानी त्रिचनापल्लीचे राज्य व किल्ला देखील बाजी घोरफडेचे लेंक मुराजी घोरफडे यांकडे देऊंन आपण चंदासाहेबांसहीं घेऊन साता-यास शाहुराजाकडें गेले । इकडें प्रतापसिंव्ह राजे तंजाऊर देशाचे राज्य करीत होते । तदनंतरें अण्णप्पा शटक्यानें सरखेली केल्यांत राज्य तंत्रांची कामें येक विधेंकडून चालत केलें; तरीहीं कित्येक उद्धट कृत्य करूं लागले; त्याचा जिन्नस थोडा कळवितों जे । महाराजाचा योग्य साज येकंदर आपण व आपले बाईकास एकंदर करूं लागले या खेरीज महाराजांसमीप येतेवेळेसहीं व समक्षमांतही व महाराजाशी बोलण्यांतहीं उत्धट कृत्येंच करूं लागले । तेणें कडून महाराज कांहीं मनोवैकल्यातें पाऊन अण्णपाची सरखेली काहडून मानाजीराव यांस सरखेलीहीं व फौजदारींहीं देऊन अण्णप्पा शेटक्यास थोड्या दिवसाच्या कामास घरीच असा म्हणाले ।