Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

तंजाउरची प्रेष कर्षी यावी ह्मणून जाबाब स्वाल केले तेव्हां प्रतापसिंव्ह महाराजानी कित्येक सोडवण केचा प्रसंग वाजावें प्रकारे सांगून पाठविल्यास समजेनासे मापूसखानानें आपले फौजानिशी युत्धास आले. तेव्हां प्रतापसिंव्ह महाराजानीं हीं आपली सेना पाठविले उभयतांस युत्ध तंजाउरचे किल्यास उतरेस येक कोसावरी चांगलें भांडलों जाहलें तेव्हां मापुसखानानें त्याच्या फौजेचा ही निर्वाह नाहीसें फौज वाताहत होऊन मापूसखानानें पराजय पाऊन निघून गेले तेव्हां पडाउ सांपळ्याचा आदर करून परतून खानमजकुराकडे पाठविले तदनंतरें मापूसखान आपला पराजय पावले व्यसनानें आपले बाप अनवर्दीखानास जाऊन सांगितले तेणेंकडुन अनवर्दीखानानी योचना केलीजे तंजाउरचे महाराजानी जबाब स्वाल युक्तच केले त्यास मापूसखानानें समजनासें जलदी केल्या करितां भग्न जाहला परंतू बाक्षाई फोजे माघारली ह्मणावयाची ईर्षा थोडी अंगिकरून अनवर्दीखानानी भारी स्वार बार तोपखाना काळ हस्ती वेंकटगिरी वेटवल्लम वगैरे स्थळच पाळेगार वगैरे समग्रास घेऊन तंजाउरचे राजावरी युत्धास स्वार होऊन तंजाउरास ईशान्य भागीं तीनी कोसावरी पशुपति गुडी ह्मणावयाचे गावासमीप मैदानात उतरले तेव्हां प्रतापसिंव्ह महाराजानी आपुल्या फौजापैकी तीने हजार स्वार व थोडे बार हीं जरारी तोफखाना वगैरे सन्नह गोविंदराव शेटगे व मानाजीराव जगथाप इत्यादि सरदार समागमे देउन पाठविले उभय सेनांही जमून प्रातःकाळसमयीं युत्ध जाहल्यांत तंजाउरची फौज समग्र आंत शिरून त्याच्या तोफखानासही माघ टाकून अनवर्दीखानाची फौज तमाम डव्हळून जाळून तंजाउरचे फौजेकडून बहुत फौज मारली गेली बहुत जणना वाकित देखील पुढे टिकवनासें पळून गेले शेवट तंजाउरचे फौजेचे लोकानी अनवर्दिखानाचा खांस स्वारीचा हत्ती भाल्या बर्चीचा मारानें खिळून उभा करून उड्या टाकुन हत्ती वरी चढून अंबारीच्या काहण्या कापूं लागले